आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष पाठपुराव्यातून १ कोटींचा निधी मंजूर
कोल्हापूर – कसबा बावडा आणि शिवसेनेचे अतूट नाते असून, कसबा बावडा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कसबा बावड्यातील जतना नेहमीच माझ्या बाजूने उभी राहिली असून त्याची मला जान आहे. त्यामुळेच कसबा बावड्याच्या विकासास नेहमीच प्राधान्य दिले आहे. राजाराम बंधाऱ्याच्या पर्यायी पुलाकरिता निधी, राजाराम बंधारा ते कसबा बावडा रोड करिता निधी, तिरंगा लाईट लावणे, हनुमान तलावाचे सुशोभिकरण, यासह बावड्यातील प्रमुख मार्ग आणि अंतर्गत कॉलनी, गल्ल्यामधील रस्त्याची कामे, पाणद्यांचा विकास आदि कामांसाठी आजतागायत कोट्यावधी रुपयांच्यावर निधी वितरीत केला आहे. त्यामुळे कसबा बावड्याच्या विकासाकरिता सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष पाठपुराव्यातून जिल्हा वार्षिक योजना २०२४- २५ मधून कसबा बावडा मेनरोड, एस.आर.पी.कॅम्प, दत्त मंदिर ते राजर्षी शाहू जन्मस्थळ, कागलवाडी पर्यंत रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरीकरण करणे या कामास रु.१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे उद्घाटन आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, कसबा बावडा हा कोल्हापूर शहराचा अविभाज्य घटक आहे. कसबा बावडा हिंदुत्ववादी असून, येथील जनतेने शिवसेनेला नेहमीच पाठबळ दिले आहे. कसबा बावडा वासीयांच्या प्रत्येक सुखदुखात सहभागी होत असल्याने माझे आणि कसबा बावडावासियांचे कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. या ठिकाणच्या नागरिकांना मुलभूत सोई सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्राधान्याने काम केले आहे. परंतु, काही वेळा कसबा बावडा वासीय आणि माझ्या नात्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न झाला. पण, सुज्ञ जनतेने विरोधकांची खेळी ओळखून मला या भागातून पाठबळ दिले. निवडणुका होतात जातात पण निर्माण झालेले कौटुंबिक नात टिकले पाहिजे हाच उद्देश ठेवून आगामी काळात कसबा बावड्यातील उर्वरित विकासकामांना निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
यावेळी शिवसेना समन्वयक सुनील जाधव, कृष्णा लोंढे, शिवाजी जाधव, अनिल कदम, आनंद पालकर, संकेत बिरंजे, पांडुरंग पालकर, सचिन पाटील, अनिल जाधव, सुरत सुतार, जय लाड, दादासो आळवेकर, सचिन पवार, निलेश पिसाळ, कपिल पवार, राकेश चव्हाण, धवल मोहिते, प्रज्वल चव्हाण, अक्षय निकम आदी मान्यवर उपस्थित होते.