दिवाळी साजरी करायची तर आधी थकबाकी भरा… काेल्हापूरचा आकडा ३२ काेटीच्या वर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
थकबाकी भरा, दिवाळी प्रकाशमान करा: सर्वसामान्यांप्रमाणेच महावितरणसुद्धा एक ग्राहकच आहे. महसूलासाठी अन्य कोणताही मुख्य स्त्रोत उपलब्ध नसल्याने वीजबिलांच्या वसूलीतूनच सर्व प्रकारची देणी भागवावी लागतात. पुणे प्रादेशिक विभागात सध्या घरगुतीवाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे (कंसात ग्राहकपुणे जिल्हा– २०३ कोटी ११ लाख रुपये (८,२६,७६८), सातारा २२ कोटी ५१ लाख (१,९३,३०९), सोलापूर– ५२ कोटी १५ लाख (२,७१,०४४), सांगली– २८ कोटी ९९ लाख (२,२३,२४८) आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३२ कोटी ३ लाख रुपयांची (२,४८,३०२) थकबाकी आहे. थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर आहे

काही दिवसांवर आलेला दिवाळी सण साजरा करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. सणाच्या कालावधीत विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी करताना वीजसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक वीजयंत्रणेसोबतच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सतर्क राहावे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता वीजसुरक्षेची काळजी घेत दिवाळी सण साजरा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.