महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
कोल्हापूर :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या राजर्षि छत्रपती शाहू सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त् राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, नगरसचिव सुनिल बिद्रे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, विधी अधिकारी विनोद तायडे, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सामूहिकपणे गायन केले. त्याचबरोबर महापालिकेच्यावतीने शहरातील सर्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयांचा परिसर स्वच्छ रंगरंगरोटी करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाजी चौक, निवृत्ती चौक व महापालिका राजर्षि छत्रपती शाहू सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयांभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
![]() |
![]() |
![]() |
![]() |

















































