राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक जयसिंग नलावडे यांचे निधन 

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चेंबूर येथील भाजपचे मा. मंडळ अध्यक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक आणि भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा व माजी आमदार डॉ. कांताताई नलावडे यांचे पती जयसिंगराव(अण्णा) तुकाराम नलावडे यांचे  मुंबईतील चेंबूर येथील ‘झेन’ या खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने सोमवारी २७ डिसेंबर रोजी रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. कांताताई नलावडे, मुलगा अमोल, सून नैना, मुलगी शिल्पा नलावडे – कुलकर्णी, जावई  अमित कुलकर्णी व नातवंडे असा  परिवार आहे.

त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात मंगळवारी चेंबूर येथे विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे अंतिम दर्शन राजकीय, सामाजिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी घेतले.
 
जयसिंग नलावडे यांनी १९६२-१९७० यादरम्यान पूर्णवेळ ‘जनसंघा’मध्ये स्वतःला  वाहून घेतले होते. त्यांनी १९७२ च्या काळात ‘आणीबाणी’ सुरु असताना मुंबईत भूमिगत राहून ‘जनसंघा’च्या चळवळीत महत्वाचे योगदान दिले . १९७५ पासून ‘जनता पार्टी’च्या निष्ठावान कार्यकर्त्याची भूमिका निभावत पक्ष वाढीसाठी बळकटी दिली. १९८० मध्ये ‘जनता पार्टी’चे ‘भारतीय जनता पार्टी’त विलीनीकरण झाल्यानंतर १९८५ मध्ये त्यांनी पक्षातर्फे कॉर्पोरेशनची निवडणूक लढवली.

पाच दशकांपूर्वी आपली सुविद्य पत्त्नी कांताताई यांचे राजकारणातील वर्चस्व आणि कार्य पाहून त्यांना प्रोत्साहन – पाठिंबा देण्याची भूमिका अखेरपर्यंत त्यांनी निभावली. सोबत पुस्तक छपाईच्या व्यवसायात विपुल कार्य करून अनेक दर्जेदार पुस्तकांची निर्मिती केली. साहित्य संस्कृती मंडळाच्या पुस्तकांची छपाई केली होते.
 
त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री खा. प्रकाश जावडेकर, खा. उदयनराजे भोसले, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, आ मनिष चौधरी यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. कांताताई आणि त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.