पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
चंदगड (प्रतिनिधी) : बेळगांव-वेंगुर्ला मार्गावर धुमडेवाडी (ता. चंदगड) वळणावर दुचाकींचा समोरासमोर धडत झाली. या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले आहेत. शनिवार दि. १३ रोजी रात्री अकराच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला . यामध्ये निट्टुर गावचे सुरेश रामू पाटील (वय ५०) आणि सदारवाडी येथील भगवान आनंद सदावर (वय ३८) यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. याबाबत घटनास्थळी पी.एस.आय बारामते, अमोल पाटील, दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
Loading ...
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश पाटील हे दौलत कारखान्यावर आपला ऊसाचा ट्रॅक्टर लावून गावी निट्टुरला जात होते. दरम्यान पाटणे फाटा येथून सदारवाडीकडे जाणारा भगवान यांच्या गाडीची बेळगांव-वेंगुर्ला मार्गावर धुमडेवाडी गावच्या वळणावर समारोसमोर जोरदार धडक झाली. त्यात दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पाेलीसांकडून पुढील कारवाईचे उशिरापर्यंत काम सुरु हाेते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.