तुम्ही अशा स्वच्छतागृहामध्ये जाल का.. जिथे! काेल्हापुरमध्ये आप ने केली निदर्शने…कारण

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सदर बाजार येथील 23 स्वच्छतागृहांपैकी 15 स्वच्छतागृहांची पडझड…

कोल्हापूर – सदर बाजार निंबाळकर माळ येथील सार्वजनिक स्वच्छ्तागृहांची पडझड झाल्याने स्थानिक नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. एकूण 23 स्वच्छतागृहांपैकी 15 स्वच्छतागृहे खराब झाली आहेत. मोडलेली दारे, चोकअप अशा कारणाने हे स्वच्छ्तागृहे बंद असून यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीने जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

या स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. परंतु या संदर्भात महापालिकेकडून दिरंगाई होत आहे. नागरिकांची गैरसोय पाहता महापालिकेने दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु करावे, लाईट, पाण्याची सोय करावी, मैला टाक्या स्वच्छ करून घ्याव्यात अशी मागणी शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली.

उप-शहर अभियंता रमेश कांबळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शौचालयांची पाहणी केली. कामाचे अंदाजपत्रक तयार केले असून एका महिन्यात काम सुरु करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सह-संघटक विजय हेगडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी संघटनमंत्री सूरज सुर्वे, दुष्यंत माने, आदम शेख, अमरसिंह दळवी, समीर लतीफ, मयूर भोसले, लखन मोहिते, विजय कांबळे, कुमार भोसले, श्रावण बनसोडे, प्रवीण वाघमारे, लिलाबाई ठोकळे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.