दि शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँकेत धक्कादायक सत्तानाट्य रंगले…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

राष्ट्रवादीचे डॉ. मनोज महाजन चेअरमन तर रामदास पुरी व्हाईस चेअरमन, सहकार पॅनलमध्ये उघड फूट…

धुळे (गोपाल के.मारवाडी) – जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एकेकाळी नामांकित असलेली अशी दि शिरपुर मर्चंटस को-ऑप बँकेच्या निवडणुकीनंतर एक धक्कादायक घटनाक्रम घडला. शिरपूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात हा प्रकार घडल्याने जुन्या प्रस्तावित संचालक आणि माजी चेअरमनला धक्का बसला आहे. शिरपूर मर्चंट को-ऑप बँकही गली ते दिल्लीत सुरू असलेल्या सत्ता परिवर्तन नाट्यातून सुटली नसल्याचे 12 जानेवारीला स्पष्ट झाले.

शिरपुर मर्चंट बँकेवर एकहाती सत्ता मिळवलेल्या तथाकथित सहकार पॅनलमधील अंतर्गत गटबाजी आणि नाट्यमय घटनांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज उत्तमराव महाजन आणि बँकेचे माजी चेअरमन किरण दलाल हे एकमेकांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकले होते. अध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ मनोज महाजन आणि उपाध्यक्ष पदासाठी पत्रकार रामदास दामू पुरी यांनी झालेल्या मतदानात प्रतिस्पर्धी उमेदवार अनुक्रमे किरण दलाल व संदीप देवरे यांचा आठ विरूद्ध सात अशा फरकाने पराभव केला. उल्लेखनीय आहे की, शिरपूर मर्चंट बँकेच्या सहकार पॅनलच्या 11 संचालकांची 24 डिसेंबर रोजी निवड झाली होती. तसेच मतदानापूर्वी त्यांच्याच पॅनलमधील चार संचालकांची बिनविरोध निवड झाल्याचे यापूर्वीच घोषित करण्यात आले होते.

सर्व 15 जागा काबीज करून सहकार पॅनलची एकहाती मक्तेदारी मानली जात होती. मात्र अध्यक्षपदासाठी किरण दलाल यांचे नाव काही लोकांकडून पुढे केले जात होते. 12 जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी सर्व नवनिर्वाचित संचालकांची विशेष बैठक बोलावली होती. ज्यामध्ये अध्यक्षपदासाठी डॉ. मनोज महाजन व किरण दलाल यांनी तर उपाध्यक्षपदासाठी रामदास पुरी व संदीप देवरे यांनी अर्ज दाखल केले. विहित मुदतीत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने मतदान घेण्यात आले. मतमोजणीनंतर अध्यक्षपदी डॉ. मनोज महाजन आणि उपाध्यक्षपदी रामदास पुरी हे निवडून आल्याची निवडणूक अधिकारी मनोज चौधरी यांनी घोषणा केली.

यानंतर बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर पांडू माळी, किसान ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. उत्तमराव महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांच्या शेकडों समर्थकांनी एकच जल्लोष करीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत केले. यावेळी संचालक मनोज अग्रवाल, सुनील अग्रवाल, अनिल कटारिया, भरत गुजराथी, गुणवंत जैन, राजेंद्र पंडित, राहुल सोनार, कल्पना महाजन, सविता पुरी, गुलाब भोई, यशवंत वाघ आदी उपस्थित होते. पडद्यामागील घडामोडी! पर्दे के पीछे क्या था, पर्दे के पीछे? स्वत:ला अनुभवी, सर्वेसर्वा आणि बँकेचे तारणहार मानणाऱ्या किरण दलाल यांना अध्यक्षपदी त्यांचीच वर्णी लागेल, अशी आशा होती. मात्र डॉ. मनोज महाजनही या पदासाठी इच्छुक होते. या निवडणुकीत डॉ. मनोज महाजन आणि त्यांची आई कल्पना महाजन हे दोघीही विजयी झाले होते. तसेच रामदास पुरी आणि त्यांच्या पत्नी सविता पुरी याही निवडून आल्या होत्या. त्यामुळे त्यांचीच एकूण चार मते पक्की झाल्याने त्यांना सत्ता हस्तगत करण्यासाठी फक्त इतर चार मतांची गरज होती. गेल्या दोन दिवसांत त्यांनी सर्वस्व पणाला लावून एकूण आठ संचालकांसह अज्ञात स्थळी निघून गेले.

यानंतर ते 12 जानेवारीला ऐनवेळी चेअरमन निवडीपूर्वी थेट बँकेच्या मीटिंग हॉलमध्ये पोहोचले आणि शेवटच्या क्षणी आश्चर्याचा धक्का दिला. सत्तेत येण्यासाठी आसुसलेल्यांचे तोंडे अकस्मात हिरमुसले कसे झाले. याचीच चर्चा सध्या शहरात व तालुक्यासहित संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येकाच्या तोंडावर आहे. या सर्व ताज्या घडामोडींचा बँकेच्या भविष्यावर कसा, किती आणि काय परिणाम होतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण बँक आधीच कोट्यवधी रूपयांचे विनातारणी कर्ज वाटप आणि अन्य गंभीर स्वरूपाच्या अनियमिततेमुळे बिकट आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. सर्वांच्या नजरा आता ठेवीदारांना दिलासा मिळणार की नाही? याकडेच लागले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.