शाहुपूरी पाेलिसांनी केला गुन्हा दाखल… त्या सहाजणांनी भाविकांसाेबत काय केले ते वाचा सविस्तर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कारला धडक देत स्क्रू ड्रायव्हरने हल्ला; आईलाही मारहाण – सहा जणांविरोधात गुन्हा

कोल्हापूर |
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवदर्शनासाठी जात असलेल्या एका कुटुंबावर रस्त्यावर अडवून प्राणघातक हल्ला करण्यात आला. अपघाताच्या किरकोळ कारणावरून सहा जणांनी मिळून हा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात मारहाण, प्राणघातक हल्ला, असभ्य वर्तन आणि महिलेसोबत अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना मंगळवारी (दि. ७ ऑगस्ट) दुपारी साडेएकच्या सुमारास लिशा हॉटेल चौकाजवळ, राजेश मोटर्ससमोर घडली. फिर्यादी आपल्या कुटुंबासह कारमधून देवदर्शनासाठी जात असताना त्यांच्या गाडीला एका दुचाकीस्वाराने उजव्या बाजूने धडक दिली. त्यानंतर थोडे पुढे जाऊन त्याच दुचाकीस्वाराने कारच्या समोर गाडी लावून गाडी अडवली आणि त्याच्या पाच साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले.

CRIME:शाहुपूरी पाेलिसांची धरपकड सुरुच… लावला साफळा गांजा विकणाऱ्याला…

या वेळी सर्वांनी मिळून फिर्यादी यांना दमदाटी करत गाडीतून खाली उतरवले. त्यातील एकाने हातातील स्क्रू ड्रायव्हरने फिर्यादीच्या डोक्यावर कानाजवळ जोरात वार केला. त्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांनी फिर्यादींच्या आईलाही हात पकडून पाठीत मारहाण केली आणि शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल असे अपमानास्पद वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी आमन मुजावर, कमरुद्दीन मुजावर, अरिफ सनती, आफरीद बागवान, कुजेफ मुजावर (सर्व रा. मणेरमळा, उंचगाव, ता. करवीर) व सरफराज देसाई (रा. शिरोली, ता. हातकणंगले) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार करीत आहेत.

CRIME: गुन्हेगार दिसला.. करा काँल! शाहुपूरी पाेलीस अँक्शन माेडवर… अट्टल टाेळी, गुंडांना केले हद्दपार!

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.