![]() |
||||
देशाच्या भवितव्यासाठी आजच्या मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहाव्यात. यासाठी केंद्र व राज्यसरकारचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. सर्वसामान्य जीवन जगण्याबरोबरच धाडसी, लढाऊ, देश रक्षणासाठी ध्येयदृष्टी डोळ्यासमोर ठेवून मुलींनी पुढे नेतृत्व करावे, म्हणूनच एनसीसीच्या कँडेटसाठी ‘शिवाजी ट्रेल ट्रेकिंग’चे पन्हाळा येथे विशेष ट्रेनिंग सुरु आहे. खडतर परिस्थीतीत छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांनी पन्हाळा ते विशाळगड ही मोहीम कशी यशस्वी केली, त्याचा अनुभव, ती माहिती एनसीसीच्या मुलींना मिळावी व हा शिवाजी ट्रेल ट्रेकींग थरार, तो गनिमी कावा, ती ऐतिहासिक युद्धभूमीचा अनुभव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत न राहता, संपूर्ण देशभरातील मुलींनी, मुलांनी तसेच एनसीसीच्या कँडेटसी सर्वांना सांगावा, हा मूळ उद्देश या मोहिमेचा आहे. या मोहिमेचे नेतृत्व महाराष्ट्र बटालीयनने कोल्हापूरने केले आहे. या मोहीमेतून मुलीं भविष्यात लढवय्या बनतील, नेतृत्वगुणाचे धडे घेतील असा विश्वास शिवाजी ट्रेल ट्रेकींगाचा फ्लँग दाखविताना मेजर जनरल (ADJ-एनसीसी डायरेक्टर) योगेंद्रसिंह यांनी व्यक्त केला. VIDEO पाहण्यासाठी क्लिक करा.. https://youtu.be/mdiuMgiFScY?si=3ENZ_etXaGfaCv9u देशातील पहिली एनसीसी मुलींची एक तुकडी पन्हाळा ते विशाळगड खिंड अशी रवाना झाली. यावेळी मेजर जनरल योगेंद्रसिंह यांच्याहस्ते फ्लँग दाखविण्यात आला. शिवाजी महाराज की जय.. जयभवानी जय जिजाऊ अशा प्रेरणा देणाऱ्या घोषणा देत तुकडीने आगेकुच केली. फ्लँग दाखविताना ब्रिगेडिअर विक्रांत कुलकर्णी, बिग्रेडिअर अभिजीत वाळिंबे, कमांडर पुनीत गोगिया यांच्यास पुणे, बेळगाव, कोल्हापूर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. VIDEO पाहण्यासाठी खालील निळ्या लिंकला क्लिक करा https://youtube.com/shorts/OyD7_TYpdsw?si=FeoMFNgdz80dj0yq ही मोहीम आठ दिवसांची असून, याआधीच मुलांच्या चार तुकड्या आधीच रवाना झाल्या आहेत. आज पहिली मुलींची तुकडी रवाना झाली, मुलांच्या देखिल सर्व तुकड्या यशस्वी मार्गस्थ झाल्याचे ब्रिगेडीअर अभिजीत वाळंबे यांनी सांगितले. ब्रिगेडिअर विक्रांत कुलकर्णी म्हणाले की महाराष्ट्र ही लढव्या थोर पुरषांची भूमी आहे. एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून, या ठिकाणी एनसीसीच्या कँडेटसना येथे खूप शिकण्यासारखे आहे, तोच अनुभव देण्याचा एक उपक्रम शिवाजी ट्रेल ट्रेकिंगच्या माध्यमातून केला जात आहे. NCC च्या आणखी बातम्या पाहण्यासाठी या निळ्या लिंकला क्लिक करा… महाराष्ट्र ही संतांची आणि शौर्याची भुमी- सतेज पाटील
|