दिव्यांग व्यक्तींना ही सुविधा सुरु.. वाचा सविस्तर- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले प्रयत्न

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सीपीआरमधील गोदावरी इमारतीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून
दिव्यांग प्रमाणपत्र वितरण सुविधा सुरु

कोल्हापूर  : दिव्यांग व्यक्तींकरिता अस्थिव्यंगोपचार विभागाची दिव्यांग प्रमाणपत्र वितरण सुविधा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून सीपीआरमधील गोदावरी इमारतीमध्ये आज सुरु करण्यात आली आहे.

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये अस्थिव्यंगोपचार विभागाचा दिव्यांग प्रमाणपत्र वितरण विभाग पहिल्या मजल्यावर कक्ष क्र.१०४ येथे होता. दिव्यांग व्यक्तींना या कक्षामध्ये तपासण्याकरीता जाण्यासाठी लिफ्टची सोय नसल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना पहिल्या मजल्यावर जाणे अडचणीचे असल्याने हा विभाग स्थलांतरीत करण्यात आला.
या गोदावरी इमारतीमध्ये दिव्यांग वितरण विभागाशी संबंधित सर्व कर्मचारी उपस्थित असणार आहेत. तसेच दिव्यांग व्यक्तींना येणा-या अडचणींच्या अनुषंगाने कार्यालयीन वेळेत दिव्यांग मदत कक्ष क्र. ९२८४८४८२४५ वर संपर्क साधून दिव्यांग व्यक्ती आपल्या प्रमाणपत्राशी संबंधीत माहिती मिळवू शकतील, अशी माहिती छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे यांनी दिली आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.