सावधान…तुमच्यावर नजर! दारु पिऊन गाडी चालवाल तर..हाेणार कारवाई कठाेर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जगभर ३१ डिसेंबर उत्साहात साजरा केला जाताे. मात्र अशा वेळी तरुणांनी, चालक, वाहकांनी तसेच खासगी वाहनचालक, मालक यांनी देखील खबरदारी घ्यावी, दारु पिऊन गाडी चालवू नये,  मद्दपान करून गाडी चालविल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिला आहे. त्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन विभागाने थेट माेहीम देखिल सुरु केली आहे. 30 डिसेंबर 2023 रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर व जिल्हा पोलीस दल यांचे संयुक्त विद्यमानाने दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर मोटर वाहन कायदा व नियम अंतर्गत कारवाई करण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली.

यामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाची सहा पथके सहभागी झाली होती. कोल्हापूर शहर इचलकरंजी शहर व जयसिंगपूर येथे या पथकांमार्फत एकाच वेळी तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एकूण 19 दुचाकी स्वार दारू पिऊन वाहन चालवताना आढळली. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये  दुचाकी स्वारांचे अपघाताचे प्रमाण जास्त वाढले आहे. वेगाने बाईक चालविणे…गर्दीत वेडीवाकडी वळविणे, कायद्याचे भान नसणे या सुरक्षितेची काेणताही काळजी न घेण्यात येणाऱ्या वाहनचालकांवर देखिल   प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्याची मोहीम राबवण्यात येत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले .यावेळी पालकांनीही आपल्याला पाल्यांना याेग्य त्या सुचना द्याव्याते. कायद्याचे पालन सर्वांनीच केले पाहिजे. स्वतः सुरक्षित वाहन चालविणे आणि दुसऱ्याचेही संरक्षण करणे  हा आदर्श ठेवावा असेही दीपक पाटील व पंडित यांनी शेवटी स्पष्ट केले आहे. 

या मोहिमेमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक राहुल नलवडे,उदय केंबळे, किरण खोत,  सागर भोसले, विजयसिंह भोसले,  विजय मोरे,  अभिजीत पोटे, व शहर वाहतूक शाखा कोल्हापूर व इचलकरंजी चे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे व राजू पाटील यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे सर्व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यामध्ये सहभागी झाले होते. दिनांक 31 डिसेंबर रोजी ही शहरांमध्ये सायंकाळपासून पहाटेपर्यंत ही तपासणी मोहीम चालू असणार आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.