शासकीय समित्यांसाठी नावे द्या…..हसन मुश्रीफ

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादीच्या नेत्यांना निर्देश*

*कोल्हापूर:अनेक वर्षापासून विविध प्रकारच्या शासकीय समित्या गठीत झालेल्या नाहीत. तसेच; विशेष कार्यकारी दंडाधिकारी ही पदेही रिक्त आहेत. त्यामुळे; ३१ डिसेंबरअखेर नेत्यांनी कार्यकर्त्यांची नावे द्यावीत. म्हणजे या समित्या गठीत करता येतील, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्ताधारी पक्षातील तीनही गटाच्या नेत्यांना दिले. शासकीय विश्रामगृह येथे रविवारी भाजप, राष्ट्रवादी तसेच शिंदे गटाच्या नेतेमंडळींच्या बैठकीत ते बोलत होते.*

*यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार विनय कोरे, आमदार राजेश पाटील, मानसिंगराव गायकवाड, माजी आमदार अमल महाडीक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहूल देसाई, शहराध्यक्ष विजय जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक -निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र माने, सत्यजीत कदम, आदील फरास आदी उपस्थित होते.*

सध्याचे सुरू असलेले राजकारण हे तुम्हाला प्रतिष्ठेचे व सत्याचे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...

पालकमंत्री  मुश्रीफ म्हणाले, लवकरच लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका सुरू होतील. त्यांची आचारसंहिता सुरू होईल. त्यामुळे अद्यापही ज्या शासकीय समित्यांच गठण झालेले नाही, त्यांचे गठण होणे आवश्यक आहे़. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लांबल्याने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. विशेष म्हणजे २०१६- १७ पासून अद्यापपर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदे भरलेली नाहीत. त्याच्याही नियुक्त्या होणे आवश्यक आहे़. आतापर्यंत नियोजन, डोंगरी समिती, वृध्द कलावंत, दक्षता, ज्येष्ठ नागरिक, बालकामगार, वेठबिगार, मराठी भाषा या समिती गठीत झाल्या आहेत. मात्र डीआरडीए, एमएससीबी, सीजीएस, उद्योग, दिव्यांग, सैनिक, सीपीआर, पर्यावरण, खनिज, तंबाखु विरोधी, राष्ट्रीय आरोग्य, अल्पसंख्यांक, भ्रष्टाचार आदी समित्यांचे गठण झाले नसल्याचे एका कार्यकर्त्याने पालकंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.*

*निधी वेळेत खर्ची पडणे आवश्यक…..!* *जिल्हा नियोजन विभागाकडून निधी निर्धारीत वेळेत खर्ची पडणे आवश्यक आहे़. यापुर्वीच निधी वितरणाचे ३०:३०:३०:१० हे सूत्र ठरले आहे़. मात्र; त्यासाठी त्या प्रमाणात विकासकामे सुचवली गेली नाहीत. तातडीने सर्वांनी विकासकामांची यादी संबंधित विभागाकडे सादर करावी. ज्यामुळे प्राधान्यक्रम ठरवून त्यासाठी निधीची तरतूद करता येईल, असेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी सुचविले.*

*कोल्हापूर : शासकीय समित्यांचे गठण तसेच निधी खर्चाबाबतच्या आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडीक, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार राजेश पाटील आदीसह प्रमुख मान्यवर.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.