धक्कादायक- हेल्मेट असूनही मृत्यू.. अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात… चंदगडमधील घटना

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

चंदगडः धक्कादायक… एका बाईकस्वाराचा अपघातात मृत्यू झालाय.. गंभीर जखमी झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. बेळगाव येथे त्यांना रुग्णालयात नेण्यात येत हाेते. मारुती पाटील (वय.५५ रा. नागरदळे, ता. चंदगड) असे निधन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मारुती पाटील हे गुरुवारी दि. २२ राेजी माेटरसायकलवरून (MH- 09-DE-4659) यर्तनहट्टी येथे जात होते. दरम्यान चन्नेटी ते दड्डी रोडवर त्यांना एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या भीषण अपघात अपघातात चालक मारुती गोपाळ पाटील (वय ५५, रा. नागरदळे, ता. चंदगड) हे गंभीर जखमी झाले.

त्यानंतर तात्काळ त्यांना अँब्युलन्सने बेळगांव येथे उपचाराकरिता हलवण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. याबाबत कोवाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार पो.स.ई. नाईक हे पुढील तपास करत आहेत.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

**खरतर  मारुती पाटील यांच्याकडे हेल्मेट देखिल हाेते. वास्तविक पाहता, त्यांनी हेल्मेट घातलेला असतानाही देखिल हा अपघात त्यांच्या जीवावर बेतला आहे. त्यामुळे वाहनाचा वेग, गाडी चालवितानाचा निष्काळजीपणा, अरुंद रस्त्यांचा प्रश्न, आणि हेल्मेटची सुरक्षितता बाळगूनही हा अपघात झाला. नि यात एकाचा मृत्यू हाेताेय. यामुळे हा अपघात नेमका कसा घडला यावर चर्चा सुरू हाेती. 

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.