कंदलगावसह पंचक्रोशीच्या विकासासाठी भरीव निधी दिला जाईल – ऋतुराज पाटील

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

कंदलगावमध्ये ७ कोटी २५ लाखांच्या विकासकामांचा आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते शुभारंभ…

कोल्हापूर – कोल्हापुर दक्षिणमधील कंदलगाव येथे ७ कोटी २५ लाखांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये ५० लाखांच्या निधीतून क्रीडांगण विकसित करण्यात येणार आहे. कंदलगावसह पंचक्रोशीच्या विकासासाठी आणखी भरीव निधी दिला जाईल, अशी ग्वाही यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे ७ कोटी २५ लाखांच्या निधीतून विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. कंदलगाव येथील ५० लाखांच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या क्रीडांगण कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाला. त्याचबरोबर स्मशानभूमी आणि पाटील मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १० लाख, कंदलगाव ते कोगील खुर्द दरम्यानच्या पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी १५ लाख, कंदलगाव ते गोकुळ शिरगाव रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणासाठी १ कोटी, कळंबे तर्फ ठाणे, पाचगाव, भारती विद्यापीठ, पाचगाव हद्द ते कंदलगाव पुलापर्यंत, तसेच कंदलगाव, कोगील बुद्रुक रस्ता रुंदीकरण आणि आर.सी.सी. गटर्स बांधकामासाठी ४ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

कंदलगावातील या सर्व विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याबरोबरच जागतिक कुस्ती आखाडा या तालमीतील मॅट कव्हरचे लोकार्पण करण्यात आले. आमदार सतेज पाटील आणि आपण स्वतः या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. कंदलगावसह पंचक्रोशीतील विकास कामांबरोबरच आणखी विकास कामं करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

कंदलगावचे सरपंच राहुल पाटील, उपसरपंच सतीश निर्मळ, माजी सरपंच अजित पाटील, माजी उपसरपंच उत्तम पाटील, साहील पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कुंडलिक भगत, दगडू रणदिवे, किरण निर्मळ, राजेंद्र निर्मळ, अरविंद पाटील, कालू पाटील, श्रीपती पुंदीकर, चंद्रकांत अतिग्रे, सुनील पाटील, पांडुरंग सुतार, संदीप मोरे, अंबाजी रणदिवे, साताप्पा कांबळे, विलास कांबळे, विश्वास कांबळे, मोरेवाडीचे उपसरपंच संजय वास्कर, माजी जि. प. सदस्य शशिकांत खोत, संग्राम पोवाळकर, नारायण गाडगीळ, संग्राम पाटील, विश्वास गुरव, विकास पवार – बावडेकर, हर्षद गुरव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.