लंडनच्या कोव्हेंट्री युनिव्हर्सिटीमधून घेतली पदव्युत्तर पदवी…
कोल्हापूर – कोल्हापुरातील ताराबाई पार्कमधील रोहित सचिन डोणकर यांने लंडनमधील सुप्रसिद्ध कोव्हेंट्री युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याने “एम. एस. स्सी. इन इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम मॅनेजमेंट विथ एक्स्टेंडेड प्रोफेशनल प्रॅक्टिस” या विषयात मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. सध्या तो लंडनमधील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शेफ जॉर्डन रामसे यांच्या हॉटेलमध्ये शेफ म्हणून कार्यरत आहे.
केडीसीसी बँकेच्या केंद्र कार्यालयातील निरीक्षक सचिन केशव डोणकर व करवीर तहसील कार्यालयाच्या लिपिक सौ. नेहा सचिन डोणकर यांचा तो मुलगा होय. दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये झालेल्या रोहितने विवेकानंद महाविद्यालयातून बारावी वाणिज्य शाखेचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर केंद्र सरकार पुरस्कृत गोव्यातील प्रसिद्ध इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ( आय. एच. एम.) या संस्थेतून त्यांनी बी. एस. स्सी. ही पदवी पूर्ण केली. गेली दोन वर्षे तो लंडनमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होता.