निर्भीड पत्रकारितेचा वसा घेतलेल्या पत्रकारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे – विक्रम सेन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन एआयजे ची वार्षिक बैठक अंधेरी वेस्ट स्थित कंट्री क्लब हॉटेल,मुंबई येथे मोठ्या उत्साहात…

 

मुंबई (गोपाल के. मारवाडी) – नॅशनल असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्ट, “एआयजे” संघटनेचे, इतर राज्यांचे राष्ट्रीय पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षां सहित पदाधिकारीगण यांची कंट्री क्लब हॉटेल, अंधेरी वेस्ट, मुंबई येथे 10 वी वार्षिक सर्वसाधारण सभा, राष्ट्रीय अध्यक्ष श्री विक्रमजी सेन, राष्ट्रीय सरचिटणीस पं. मनोहरजी मंडलोई आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मो. सईदभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आले.यासाठी मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र, आसाम, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, छत्तीसगड इ. राज्यांतून संस्थेचे अनेक मान्यवर पत्रकार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

या सभेत राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमजी सेन आणि मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सर्वप्रथम विद्येची देवी माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विविध राज्यांतून आलेल्या सर्व पत्रकारांचे एआयजेच्या अधिकाऱ्यांनी तिरंगा मफलर देऊन स्वागत केले. भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस पं.मनोहरजी मंडलोई यांनी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. तसेच प्रस्तावना केली. उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींना संस्थेच्या उद्दिष्टे व कार्यक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. हे उल्लेखनीय आहे कि, गेल्या दहा वर्षांपासून देशातील सर्वात मोठी ही संघटना अधिकृत नोंदणीकृत आहे. आणि सध्या सुमारे 25 राज्यांमध्ये त्याचे सुमारे 80 हजार सभासद आहेत. ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया नेटवर्किंग मधील ख्यातनाम टीव्ही चॅनल्स, प्रमुख दैनिके, न्यूज पोर्टल आणि साप्ताहिकांचे पत्रकार बंधू-भगिनी जुळलेले आहेत. संस्थेचे सभासदत्व एक रुपयाही न आकारता निःशुल्क दिले जाते.

संपूर्ण पारदर्शकतेने ही संस्था पत्रकारिता जगताशी निगडित असलेल्या आपल्या सर्व सभासद पत्रकार बंधू-भगिनींना सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर असते. आजच्या बैठकीत सद्यस्थितीत जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी तातडीने बरखास्त करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. असे पं मनोहरजी मंडलोई यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमजी सेन यांनी पत्रकारिता जगतात सृजनशील व लोकहितकारी लेखणीतून आपल्या समाजाचे प्रबोधन करणाऱ्या पत्रकार बंधू-भगिनींना सुवर्णपदक, ट्रॉफी, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि निर्भीड, रचनात्मक पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित केले. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमजी सेन यांनी आपल्या चिर-परिचित शैलीत उपस्थित पत्रकार साथींना संबोधित करताना सांगितले की, आपल्या जीवनात पत्रकारिता करत असतानाच निर्भीड लेखणीद्वारे जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणा-या पत्रकारितेच्या खऱ्या रक्षकांचा आम्ही येथे सन्मान करत आहोत. ज्याचा मला अभिमान आहे.

आमच्या संस्थेबद्दल मी हे निश्चितपणे सांगू शकतो की, भारतीय पत्रकार संघ, “AIJ” ची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत आम्ही कोणाकडूनही सदस्यत्व शुल्क घेतलेले नाही. आमच्यात सामील झालेल्या सर्व पत्रकारांना विनामूल्य सदस्यत्व दिले जाते. आणि आमच्या असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्टच्या सर्व सदस्यांना, “AIJ” परिवार आणि त्यांच्या कुटुंबियांना, गुजरातमधील प्रसिद्ध पारुल विद्यापीठ आणि पारुल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याशी केलेल्या करारामुळे उच्च शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा लाभ सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. देशातील इतर राज्यांमध्येही असे प्रयत्न सुरू आहेत. सध्या आमच्या संघटनेचे देशभरातून सुमारे 80 हजार सक्रिय पत्रकार आहेत. पुढील वर्षभरात सुमारे दीड लाख पत्रकार बंधू-भगिनी संघटनेत सामील होतील, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

पत्रकार बंधू-भगिनींना प्रामाणिकपणे पत्रकारिता करताना अनेकदा मोठ्या संकटांचा आणि अडचणींचा सामना करावा लागतो. पण मी सर्वांना खात्री देतो की मी प्रत्येक क्षणी, प्रत्येक कठीण प्रसंगी आणि तुमच्या सुख-दु:खात सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त मीच नव्हे तर संपूर्ण संघटन एक कुटुंब म्हणून तुमच्या पाठीशी आहे, यात शंका नाही. आमच्या संस्थेची कायदे सल्लागार मंडळ सदस्यांसोबत आहे. याचे राष्ट्रीय प्रमुख दिल्लीचे सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ श्री आनंदमोहन माथूर आहेत. आणि महाराष्ट्रात सर्व प्रकारची कायदेशीर मदत देखील महाराष्ट्र लीगल विंग सेल,एआयजे पुणे चे अध्यक्ष एड.श्री कैलासजी पठारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहे.या देशात पत्रकारांच्या अनेक संघटना आहेत. परंतु आमच्या सर्व सभासद पत्रकारांना आमच्या संस्थेने नेहमीच प्रेरणा दिली आहे आणि सदैव त्यांच्या पाठीशी उभी आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळी आणि लढ्यातही पत्रकारितेचे बहुमूल्य योगदान आहे.कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन मुंबई येथील सुप्रसिद्ध पत्रकार श्री पवनजी पाठक यांनी केले. या प्रसंगी सकाळी 11 वाजता चहा-नाष्टा व कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मेजवानीचे ही आयोजन करण्यात आले होते.

या विशेष वार्षिक बैठक प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष श्री.विक्रमजी सेन, राष्ट्रीय सरचिटणीस पं.मनोहरजी मंडलोई, प्रदेशाध्यक्ष एम.एस.शेख, राष्ट्रीय प्रवक्ते श्री शाहनवाज शेख (मनावर) यांच्यासह हरियाणाच्या श्रीमती राधिकाजी बहल, श्री अनुरागजी शर्मा, आसामचे श्री किरणकुमार गोगोई, पुणे येथील महाराष्ट्र विधीशाखेचे प्रदेशाध्यक्ष एड. कैलास पठारे पाटील, एड. पांडुरंगजी ढोरे पाटील, एड. योगेश तुपे, अनिलजी सोनवणे, गुलशन कुमार, सौरभकुमार मिश्रा, सी. पी. राठी(गुजरात), श्री. पवनकुमार पाठक (मुंबई), तैनूर शफीक शेख, दिलीपभाई खाचर(तहलका न्यूज) श्रीमती दक्षाबेन भावसार (गुजरात महिला विंग प्रमुख), संजयकुमारजी शर्मा (देवास), श्री किशोरकुमार दग्दीजी (उज्जैन), निर्मलजी सोलंकी, श्री गोविंद सलिगा, सिकंदर नदाफ (पुणे), सुभाषजी पांडे (जबलपूर), पवनकुमार जाट, कैलाशजी सनोदिया, रशीद खान (नागदा जं.), सय्यद बाबू शेख (मुंबई सलाम), सरला नरेशभाई (सुरत), अजीजुद्दीन शेख (खरगोन), मनुभाई (मुंबई), श्री अय्यान सय्यद (मुंबई), गोपाल के. मारवाडी (शिरपूर, धुलिया), शोएब म्यांनुर, सुश्री दीपा भारद्वाज (मुंबई), फारोखभाई रावलाजी, श्रीमती मायाबेन रावलाजी (वापी), रंजिताजी शर्मा (गुजरात), ए. पद्मनाभन (आंध्र प्रदेश), उमेश चौहान (झाबुआ), संदीप जैन, जितेंद्र साळुंखे, अजयकुमार सिंग, नागेश कलसगुंडे, के.व्ही.यादव, अमोल भालेराव आदी विविध 12 राज्यातील मान्यवर पत्रकार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेरीस यानंतर पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे होणार असल्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष श्री विक्रमजी सेन यांनी केली.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.