पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
|
कोल्हापूर : केंद्र शासनाची प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील पारंपरिक कारागिरांना होण्यासाठी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा अशा सूचना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.
|
| पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना- योजनेची उदिष्टे -कारागीरांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देणे व त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी कौशल्य वृध्दी प्रदान करणे, व्यवसाय आणि योग्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणे. चांगल्या व आधुनिक साधनांसाठी सहाय्य प्रदान करणे, विनातारण आणि सवलतीच्या व्याजदरात सहज कर्ज उपलब्ध करुन देणे, डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देणे, ब्रॅन्ड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी एक व्यासपीठ प्रदान करणे जेणेकरुन त्यांना व्यवसाय वाढीसाठी नवीन संधी मिळणे सोईचे होईल. |
| योजनेमधून नोंदणीकृत कारागीरांना मिळणारे लाभ – पारंपरिक कारागीर म्हणून शासन मान्यता प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे विश्वकर्मा म्हणून मान्यता मिळेल. कौशल्य विकास (प्रशिक्षण) कौशल्य पडताळणीनंतर ५ ते ७ दिवस (४० तास) मुलभुत प्रशिक्षण, इच्छुक उमेदवारास १५ दिवस प्रगत प्रशिक्षण, दररोज ५०० रूपये प्रशिक्षण विद्यावेतन आणि टुल-किट प्रोत्साहन म्हणून १५ हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. कारागीरास पहिल्या टप्यात ५ टक्के व्याज दराने १८ महिन्याच्या परत फेडीच्या मुदतीचे रूपये १ लाख रुपये इतके वित्तीय संस्थेमार्फत अर्थसहाय्य दिले जाईल. पहिल्या टप्यातील कर्जाची यशस्वी परत फेड करणाऱ्या कारागीरास दुसऱ्या टप्पात ५ टक्के व्याज दरानेच ३ वर्षाच्या परत फेडीच्या मुदतीचे २ लाख रुपये इतके वित्तीय संस्थेमार्फत अर्थसहाय्य दिले जाईल. |
| योजनेचे लाभार्थी- असंगठीत क्षेत्रात स्वयंरोजगार तत्वावर हात औजाराने काम करणारे कारागीर १८ कुटुंब – आधारित पारंपरीक व्यवसायापैकी एका व्यवसायात गुंतलेला कारागीर. नोंदणीच्या तारखेस लाभार्थ्याचे वय किमान १८ वर्षे असावे. योजनेअंतर्गत नोंदणी आणि लाभ कुटूंबातील एका सदस्यापुरते मर्यादित राहील. शासन सेवेत असलेली व्यक्ती आणि त्यांचे कुटूंबीय या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. |
| पात्र कारागीर आणि व्यवसाय – सुतार, बोट बनविणारा, चिलखत (शस्त्रे ) बनविणारा,) लोहार, हातोडा आणि हत्यारे / औजारे/ साहित्यांचा संच बनविणारा, कुलुपे बनविणारा, शिल्पकार (मुर्तीकार, दगडे कोरणारा), दगड तोडणारा, सोनार, कुंभार, चांभार (चर्मकार) जोडे चपला बनविणारा, गवंडी काम, टोपली/चटई/झाडू बनविणारा/विणकर, , बाहुली आणि खेळणी बनविणारा, न्हावी (नाभीक), माळा बनविणारा, धोबी, शिंपी व मासे पकडण्याचे जाळे बनविणारा हे या योजनेस पात्र राहतील. |
| ऑनलाईन अर्ज पध्दती – योजनेअंतर्गत लाभासाठी लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असून अर्ज करण्यासाठी अर्जदाराला जवळच्या CSC (COMMON SERVICE CENTER) सेंटर/महा ई सेवा केंद्र / आपले सरकार द्वारे अर्ज करावा. लागेल. युजर आयडी आणि पासवर्डद्वारे लॉगीन करुन योजनेच्या लाभासाठी अर्ज करावा. यशस्वी नोंदणी आणि पडताळणी नंतर लाभार्थीस पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र शासनाकडून कारागीरांना देण्यात येईल. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र कारागीरांनी घ्यावा, असे आवाहन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. |
 |
    |
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 292