पंचगंगा नदीत झालेल्या मासे मरतुकीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण
कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील सर्वात शेवटच्या तेरवाड बंधाऱ्यामध्ये दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी शिरोळ तालुक्यात मासे मरतुकीची घटना घडत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाला मिळाली. मंडळाच्या अधिकाऱ्यांमार्फत स्थानिक कार्यकर्त्यांसमवेत तेरवाड बंधारा व आजूबाजुच्या परिसराची दि. ८ नोव्हेंबर रोजी तात्काळ पाहणी करण्यात आली.
तेरवाड बंधाऱ्याच्या मासे मरतुकीच्या ठिकाणी प्रथमदर्शनी पिवळसर काळे रंगाचे पाणी पाहणी दरम्यान दिसून आले. त्यास घरगुती सांडपाण्याचा वास असल्याचे आढळले. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांमार्फत इचलकरंजी महानगरपालिकेच्या हद्दीतील ताकवडेवेस पंपींग स्टेशन व महानगरपालिकेच्या हददीतून वाहणाऱ्या नाल्याची पाहणी करण्यात आली. यात ताकवडे वेस येथील पंपींग स्टेशन बंद स्थितीत होते व तेथून घरगुती सांडपाणी विविध नाल्याव्दारे पंचगंगा नदीमध्ये मिसळताना आढळले. पाहणी दरम्यान नाल्यावर बसवण्यात आलेली तात्पुरती निर्जंतुकीकरण यंत्रणा चालू नसल्याचे निदर्शनास आले.
म.प्र.नि.मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पृथ:करणासाठी नदीच्या पाण्याचे व नाल्यांच्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात आलेले असून ते पृथ:करणासाठी पाठवण्यात आले आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन इचलकरंजी महानगरपालिकेस प्रादेशिक अधिकारी, यांच्याकडून कलम ३३ अ जल (प्रदूषण, प्रतिबंध व नियंत्रण ) कायदा १९७४ अन्वये दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रस्तावित आदेश देण्यात आलेले आहेत. यात सदयस्थितीत बंद असलेली सर्व यंत्रणा तात्काळ चालू करण्यात यावी ,पंचगंगा नदीचे प्रदूषण होवू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून देण्यात आले आहेत.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
















































































