पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
ग्रामीण रुग्णालय गगनबावडा येथील प्रकार, बहुतांशी शासकीय कार्यालयात अधिकारी सापडतच नाहीत…
गगनबावडा :गगनबावडा तालुक्यातील दांडीबहाद्दर शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्मचारी वेळेवर कामावर येत नसल्याने सर्वसामान्यांची गैरसोय होत असून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नजर ठेवण्यासाठी गगनबावडा येथील सर्व शासकीय कार्यालयात तिस-या डोळ्याची गरज निर्माण झाली आहे. तर शहर व ग्रामीण भागातील वरिष्ट कार्यालयातील काही अधिकारी हे अनेकदा फिल्ड, व्हीजीटच्या नावाने गायब हाेतात. त्यामुळे शहरी व ग्रामीण कार्यालयात कामासाठी भेटायला येणाऱ्या नागरिकांना ताटकळत , वाट पहावी लागते, अधिकारी शाेधा व मगच काम करून घ्या, अशीच म्हणण्याची वेळ येते. त्यामुळे अशा कामाच्या नावाखाली गायब हाेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अंकूश काेण ठेवणार, वरिष्ठ अचानक पाहणी करून याचा भांडाफाेड करतील का अशी मागणी ग्रामस्थांची हाेत आहे.
गगनबावडा तालुका भौगोलिक दृष्ट्या दोन खोरीमध्ये विभागला आहे वाहतूक सुविधेच्या मर्यादा येतात. बरेच कर्मचारी दुपारच्या सुट्टीनंतर भेटतच नाहीत, त्यामूळे नागरिकांना फुकट हेलपाटे मारावे लागत आहेत. – संतोष गुरव सरपंच ग्रामपंचायत वेसर्डे
***अशी परिस्थिती एका बाजूला तर अनेक अधिकारी शनिवार, रविवार अशी जाेडून सुट्टी आल्यास शुक्रवारी देखिल दांडी मारण्याचा प्रकार करतात किंवा फिल्ड या व्हिजीटच्या नावाखाली शुक्रवारीच दाैऱ्यावर गायब हाेतात. अशी देखिल स्थिती असल्याचे येथील नागरिक सांगतात.
***तर काही अधिकारी हे भेटायला येणाऱ्या ग्रामस्थांची देखिल गैरसाेय करतात, त्यांना विनाकारण व्हीसीच्या नावाखाली, हेरींगच्या नावाखाली तासनतास बसून ठेवतात.. भेटीगाठीची वेळ ठरलेली असताना देखिल तातडीने भेटून समस्या एकून घेत नाहीत, त्यांना ताटकळतच ठेवण्यातच धन्यता मानतात. असे प्रकार अनेक शहरी व ग्रामीण भागातील महत्वाच्या शासकीय कार्यायलात अनेकांना अनुभवयाला मिळत आहेत. शहरातील तर काही शासकीय कार्यालयात दुपारी २ नंतरची भेटण्याची वेळ करूनही अधिकारी सक्षमपणे अनेकांना वेळ देत नाहीत, किंवा हजर राहत नाहीत. ही वस्तूस्थिती असून यावर देखील नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय.
गगनबावडा तालुका दुर्गम असल्याने या ठिकाणी असणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी व अधिकारी आठवड्यातील बरेच दिवस कामावर येत नसल्याचे वास्तव आहे . त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात. तरीही कामे होत नाहीत.
या ठिकाणी तहसिल कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय. निबंधक कार्यालय, भूमि अभिलेख, बांधकाम विभाग, अशी अनेक कार्यालय आहेत. पण या ठिकाणी आठवड्यातून बरेच दिवस कार्यालयामधील कर्मचारी व अधिकारी नसतात.
दुपारच्या सुट्टीनंतर त्यांना शोधणेही अवघड होते. कर्मचाऱ्यांची माहिती घेतली असता यामध्ये बर्याच कार्यालयामध्ये कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले.
गगनबावडा ग्रामीण रुग्णालयांमध्ये तर वैद्यकीय अधिकारी म्हणून एक दांपत्य कार्यरत आहे. परंतु यामधील पत्नी कधीही कामावर हजर नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन पगारात एक अधिकारी कार्यरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.