VIDEO पहा-हळदीचे स्मशान… नातेवाईकांना करतेय परेशान! मृतदेहाला अग्नि देताना हाेतेय अवहेलना

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

हळदीःअरविंद सावरतकर

हळदी:समाजात एकाद्या व्यक्तीचा प्राण गेल्यानंतर, त्याची शेवटची अंत्ययात्रा पाेहाेचते ती स्मशानभूमीतच. आजकाल अनेक गावातमध्ये स्मशानभूमी देखिल आता सुंदर व बगिच्या असलेल्या तसेच याेग्य साेयीसुविधा देऊन बनविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आपण स्मशानभूमित आहाेती, की एकाद्या बागेत, अशी नातेवाईकांना स्मशानभूमीचा परिसर पाहून वाटते. मात्र काेल्हापूर जिल्ह्यातील हळदी गाव याला अपवाद आहे. हळदी गावात असलेली स्मशानभूमी म्हणजे असून नसल्यासारखीच आहे. अत्यंत दुरावस्थेत असलेली हळदीची स्मशानभूमी पाहून गावातील नातेवाईकांच्या संतापाची लाट पसरत आहे. शेवटच्या घटकेला देखिल स्मशानभूमित एकाद्या व्यक्तीच्या मृतदेहाची अवेहलना करण्यात प्रशासनाला काय आनंद मिळताे, असाच सवाल येथे उपस्थित केला जात आहे. याबाबत गावातील काही सामाजिक, प्रतिष्ठीत नागरिक, तसेच नातेवाईकांनी अनेकदा ग्रामपंचायतीला लेखी वजा ताेंडी तक्रारी दिल्या आहेत, तरी देखिल येथील निर्ढावलेले प्रशासन गांभिर्याने न घेता, नातेवाईकांच्या परिस्थितीचा अंत पाहत आहेत. 

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

हळदी ग्रामपंचायत स्मशानभूमी आहे मात्र, मृतदेहाला माेक्ष मिळण्यासाठी जाे अग्नी  देण्देयात येताे ताे कसा द्यायचा असा प्रश्न नातेवाईकांपुेढ येताे. ज्या  शेगडी चा वापर होतो त्याच शेगडीची अवस्था खराब  व दयनीय झालेली आहे. एखाद्या व्यक्तीचे निधन झालं तर त्याला शांततेत अग्नी ही देता येत नाही. विविध प्रकारचा खटाटाेप केल्यानंतरच, अग्नि देण्याची प्रक्रीया पार पाडली जाते. यासाठी अनेक विघ्न पार पाडून, मृतदेहाला अग्नि दिला जाताे. या व अशा अनेक समस्या असल्याने गावातील लाेक त्रासले आहेत. संतापले आहेत. प्रशासनासमाेर अनेकदा गाऱ्हाणे मांडून देखिल याची गांभिर्याने दखल घेत नसल्याने आता लाेक एकवटून आंदाेलन करण्याच्या तयारीत आहेत. तरी प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात स्मशानभूमितील गैरसाेय दूर करून, सुविधा द्याव्यात अशी मागणी केली जात आहे. याविषयी येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी देखिल दुजाेरा देत, प्रशासनाने गांभिर्याने न घेतल्यास आम्हाला आंदाेलन करावे लागेल असे स्पष्ट केले आहे.

यासंबंधी गावातील सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकार संघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तम व्हरांबळे तसेच कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष  मारूती वाडकर यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. गावातील अन्य सुविधांबराेबरच स्मशानभूमि देखील अत्यंत महत्वाचे आहे. येथे काेणतेही राजकारण न आणता, निधीची अडचण न सांगता, सामाजिक बांधिलकी जपत येथे सुविधा देणे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे. असे सांगितले.

स्मशानभूमिच्या सुशाेभिनकरणासाठी आलेला निधी याेग्य कामासाठी तसेच तत्काळ वापरून सुविधा देण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार असला पाहिजे. ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने तरी याकडे जातीने लक्ष घालावे. अशी मागणी ग्रामस्थांसह उत्तम व्हरांबळे व मारुती वाडकर यांनी केली आहे. 

या बातम्या देखील जास्त वाचल्या गेल्या.. तुम्ही वाचा.. 

खासदार महोत्सव अंतर्गत झिम्मा-फुगडी स्पर्धेचे १० ऑक्टोबरला आयोजन – अरूंधती महाडिक

https://positivewatch.in/shaumika-mahadik-in-lok-sabha-arena-from-kolhapur-that-banner-sparked-discussions/

जिल्हा ग्राहक न्यायालय अध्यक्ष व अन्य पदांची नियुक्ती करा – सतेज पाटील

व्हीडीओ पाहण्यासाठी यु ट्युब चँनेलला खाली दिलेल्या निळ्या लिंकला क्लिक करा… 

https://youtu.be/h4fgx29myyo?si=R7X_vKxhVTopsenV

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.