काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला करवीर तालुक्यातून उस्फुर्त प्रतिसाद…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली जनसंवाद पदयात्रा आज करवीर तालुक्यात…

कोल्हापूर – जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली जनसंवाद पदयात्रा आज गुरुवारी करवीर तालुक्यात पोहोचली. प्रयाग चिखली येथून सुरु झालेल्या या पदयात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पदयात्रे दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न देखील जाणून घेतले.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेली जनसंवाद पदयात्रा आज गुरुवारी करवीर तालुक्यात पोहोचली. प्रयाग चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून करवीर तालुक्यातील जनसंवाद यात्रेस प्रारंभ झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांसह युवक-युवती, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामील झाले होते. प्रयाग -चिखली, आंबेवाडी वडणगे पोवार पाणंद या मार्गावरून ही पदयात्रा वडणगे या गावात पोहचल्या नंतर येथील पार्वती मंदिर चौक येथे संवाद सभा झाली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत देखील करण्यात आले.

या पदयात्रेमध्ये आमदार पी. एन. पाटील, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, बाजीराव खाडे सुरेश कुराडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, राजेश पाटील, भारत पाटील भुयेकर, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, सत्यजित पाटील, उदय पाटील, शिवाजी कवठेकर, सुयोग वाडकर, तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, अमर पाटील, अश्विनी धोत्रे, पैलवान संभाजी पाटील, रामकृष्ण पाटील, चिखली सरपंच रोहीत पाटील, केवलसिंग रजपूत, प्रभाकर पाटील, उतम चौगले, एम जी पाटील, राम जाधव, वडणगे माजी सरपंच सचिन चौगले, बी आर पाटील, विठ्ठल माने, रविंद्र पाटील, हंबीरराव वळके यांच्यासह नागरी उत्स्फूर्तपणे या पदयात्रेत सहभागी झाले होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.