|
..अखेर कनाननगरातील ती मुले सापडली…! कनानगरातील अपहरण झालेल्या मुलांचा शोध हैदराबाद मध्ये लागला संशयित महिलेला शाहूपुरी पोलिसांनी घेतलं ताब्यात 27 ऑगस्ट ला मुलांचं झालं होतं अपहरण शाहुपूरी पाेलिसांची यशस्वी कामगिरी काेल्हापूरः 27 ऑगस्टला कोल्हापूर शहरातील कनाननगर येथील भीक मागण्यासाठी अपहरण झालेल्या दोन मुलांचा शोध हैदराबाद मध्ये लागला आहे. याप्रकरणी अपहरण करणारी संशयित महिला काजल सुधाकर सूर्यवंशी हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. कलानगर परिसरामध्ये राहणाऱ्या बारा वर्षे भीमा मोहन कुचकोरवी आणि अकरा वर्षीय रूपाली नितीन खाडे या दोन मुलांचे भीक मागण्यासाठी झाले हाेते. संशयित महिला काजल सूर्यवंशी हिने त्यांचे अपहरण केले होते. यानंतर हैदराबाद इथं नेऊन भीक मागायला लावले. दिवसभरात भीक मागून मिळालेले पैसे ती मुलांकडून काढून घेत होती. दरम्यान तीन ऑगस्टला आई-वडिलांची आठवण येत असल्याने रेल्वे स्टेशन परिसरात भेटलेल्या अब्दुल मुसळ या व्यक्तीच्या मोबाईलवरून या मुलांनी आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला यानंतर ही मुले हैदराबाद मध्ये असल्याचं समोर आलं. या मुलांच्या पालकांनी तातडीने शाहूपुरी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांचे एक पथक तात्काळ हैदराबादला. रवाना झाले .स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेऊन या दोन्ही मुलांची सुटका केली आहे. |
























































