पोलीस अधिक्षक कार्यलयात झाली ही कार्यशाळा…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

बाल कल्याण समितीमार्फत पोलीस अधीक्षक कार्यालयात एक दिवशीय कार्यशाळा…

कोल्हापूर – बाल कल्याण समितीमार्फत पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांचे एक दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात बाल कल्याण समिती सदस्या अँड. शिल्पा सुतार यांनी जे जे अॅक्ट 2015 तसेच पोक्सो कायदा 2012 या कायद्याबाबत मार्गदर्शन केले. बाल कल्याण समितीमध्ये येणाऱ्या लैंगिक अत्याचारास बळी पडणा-या बालकांच्या प्रकरणांविषयी संवेदनशीलता, बाल पोलीस अधिकारी म्हणून बालकांबाबतचे विषय कसे हाताळावेत, बाल लैंगिक गुन्ह्यांमध्ये पोक्सो कायद्यांतर्गत पीडीत बालकास 24 तासाच्या आत बाल कल्याण समितीला कळविणे बंधनकारक असल्याबाबत, बालकाचे समुपदेशन सपोर्ट पर्सन ची भूमिका, मनोधैर्य योजनेचा लाभ आणि वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणेने प्रयत्नशील राहण्याबाबत मार्गदर्शन केले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

बाल कल्याण समिती सदस्या अॅड. अश्विनी खाडे यांनी बाल स्नेही वातावरणात बालकांविषयी बाल पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभागाबाबत मार्गदर्शन केले. बाल कल्याण समिती सोबत येणाऱ्या पोलीसांच्या सहभागामध्ये सुरळीतपणे कार्यपध्दत चालू राहण्यासाठी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असून आता सभोवताली समाजात घडणाऱ्या बालकांविषयीच्या गंभीर गुन्ह्यांवर काम करणे तसेच उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पोलीसांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, असे सांगितले.

श्रीमती पद्मजा गारे यांनी बाल कल्याण समितीची कार्यपध्दती व त्यातील पोलीसांचा सहभाग, बालगृहामध्ये बालकास दाखल करताना आवश्यक असणा-या मुद्यांवर मार्गदर्शन केले. काळजी व संरक्षणांतर्गत येणारी बालकांची प्रकरणे बाल कल्याण समितीसमोर येतात. तसेच विधी संघर्षग्रस्त बालकांची प्रकरणे बाल न्याय मंडळासमोर येतात. बाल कल्याण समिती 24 तास रोस्टर कार्यपध्दतीनुसार समितीच्या बैठकीच्या वेळेव्यतिरिक्त कशापध्दतीने कार्यरत असते, याबद्दल मार्गदर्शन केले. बालिकांचे वैद्यकीय गर्भपात करतानाची कार्यपध्दती, त्यात येणाऱ्या अडचणी व तोडगे या विषयांवर मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणावेळी पोलीस अधीक्षक महेंद पंडीत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. व्ही. पाटील यांचे सहकार्य लाभले.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.