जिल्हा ग्राहक न्यायालय अध्यक्ष व अन्य पदांची नियुक्ती करा – सतेज पाटील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

आमदार सतेज पाटील यांचे विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र…

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा ग्राहक न्यायालयामध्ये रिक्त असलेल्या अध्यक्ष, सदस्य व प्रबंधक पदांची लवकरात लवकर नियुक्ती करावी अशी विनंती विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ग्राहकांना योग्य वेळेत न्याय मिळावा यासाठी राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा ग्राहक न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहक न्यायालयातील अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार सांगली जिल्ह्यातील अध्यक्षांकडे होता, परंतू ते ही सेवानिवृत्त झाल्यामुळे कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील ग्राहक न्यायालयात अध्यक्ष पद रिक्त आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही सदस्यांची मुदतही संपलेली आहे.

ग्राहक न्यायालयात केवळ कर्मचारी वर्ग आहे, मात्र अध्यक्ष व सदस्य नसल्याने पक्षकार आणि वकीलांना पुढील दीड-दोन महिन्यांची तारीख दिली जात आहे. यामुळे जिल्ह्यात 2500 ते 3 हजार खटले निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच 2015 पासून प्रशासनाचे प्रबंधक पदही जिल्हा ग्राहक न्यायालयात रिक्त आहे. त्यामुळे या सर्व रिक्त पदांवर लवकरात लवकर नियुक्त्या करून जिल्ह्यातील पक्षकार व वकील यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती आमदार सतेज पाटील यांनी या पत्राद्वारे केली आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.