हॉंगकॉंग आणि चीन येथे भरणाऱ्या व्यापारी प्रदर्शनास मराठी उद्योगांना संधी…
मुंबई – मुंबईस्थित मराठी चेंबर ऑफ कॉमर्स सन २००८ सालापासून हॉंगकॉंग आणि चीन येथे भरणाऱ्या व्यापारी प्रदर्शनास मराठी उद्योगांना नियमितपणे घेऊन जात आहे. आत्तापर्यंत सुमारे ५०० उद्योजकांनी या संधीचा लाभ घेतला आहे. या व्यापारी सहलीचा उद्देशच मुळी वेगळा आहे. इतर देशांना सहल भेट आणि चीनला व्यापारी सहल, या शब्दातच अर्थ दडलेला आहे. चीनमध्ये भरणारे कॅन्टॉन फेअर हे १९५७ सालापासून भरवले जाते. या वर्षीचे प्रदर्शन हे १३४ वे प्रदर्शन आहे. व्यापाराची होणारी प्रचंड उलाढाल लक्षात घेऊन हे प्रदर्शन ३ टप्प्यावर आयोजित केले जाते.
प्रदर्शन सव्वा कोटी फुटावर कायमस्वरूपी बांधकामावर असते. ५९,००० च्यावर स्टॉल्सची मांडणी केली जाते. दीड लाखांवर उत्पादने उपलब्ध असतात. दरवर्षी अंदाजे दहा हजार कोटींची उलाढाल होते. सुमारे १५० देशातून २,७५,००० पेक्षा जास्त उद्योजक प्रदर्शनाला भेट देतात. अलीकडे चीनबरोबर संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वळले आहे, याला कारण चीनचा वाढता कामगार खर्च आणि भारताची तरुण पिढी, तसेच सुधारत जाणारी भारतीय अर्थव्यवस्था. या सर्व घडामोडीमध्ये मराठी उद्योजक कुठे आहे, मराठी उद्योजक जगाला आपला माल विकू शकणार की नाही? उत्तर अर्थात होय असे आहे. परंतु यासाठी आपणांस आपल्या चीनी प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास करणे आवश्यक. उदा. चीनी उत्पादक माल कसा बनवितो, तो आपला माल प्रदर्शनात कसा मांडतो, इंग्रजी मोडके तोडके येऊन सुद्धा आंतराष्ट्रीय ग्राहकांशी आपल्या स्टॉलवर कसा बोलतो, या सगळ्या देवाणघेवाणीशी आपल्याला या प्रदर्शनाद्वारे तोंडओळख होते.
मराठी चेंबर ऑफ कॉमर्स विशेष औद्योगिक भेटी, कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन त्याच कालावधीमध्ये चीनमध्ये करतात. तरी मराठी उद्योजकांना असे आवाहन करावसे वाटते की, पुढच्या पिढीलासुद्धा चीनचे कॅन्टॉन फेअर जरूर दाखवावे. यासाठी मराठी चेंबर ऑफ कॉमर्स सदैव आपल्याला साथ देईल. यावर्षीची चायना टूर ही १३ ते २१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान असणार आहे. याचे बुकींग २५ ऑगस्ट २०२३ च्या अगोदर करायचे आहे.
|
इच्छुक उद्योजकांनी त्वरित संपर्क करावा. – मुंबई ऑफीस : ८९२८५३४३८१. |
















































