प्रगत माझा वर्ग अभियान गुणवत्ता वाढीस उपयुक्त – बाजीराव देशमुख

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

पत शिराळा केंद्रामध्ये प्रगत माझा वर्ग ‘या गुणवत्ता वाढीसाठी अभियान…

शिराळा – ‘प्रगत माझा वर्ग ‘या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या अभियानाची सुरुवात शिराळा तालक्यातील पत शिराळा केंद्रामध्ये झाली. विस्ताराधिकारी बाजीराव देशमुख यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू असून या माध्यमातून शंभर टक्के मुलांचे वाचन ,लेखन व अभिव्यक्ती याला महत्त्व देण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील व इतर तालुक्यातील शंभर टक्के प्रगत वर्ग असणाऱ्या तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रगत माझा वर्ग अभियान अप्रगत विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या प्रवाहात आणण्यास प्रेरक ठरेल असे प्रतिपादन शिक्षणविस्तार अधिकारी बाजीराव देशमुख यांनी केले.यावेळी गणित विषय तज्ञ शिक्षक इम्तियाज नाईक यांनी अतीशय सोप्या पद्धतीने गणित विषयाचे मार्गदर्शन केले. या अभियानाचा फायदा सर्वसामान्य अप्रगत मुलांना होणार असून गुणवत्ता वाढीसाठी हा उपक्रम अतिशय महत्वाचा ठरला जाणार आहे. यावेळी युनूस मनेर, शिवाजी पाटील, नामदेव गुरव, अरुण देसाई इत्यादी तज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.