राधानगरी धरणाचे पुन्हा पाच स्वयंचलित दरवाजे उघडले…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विजय बकरे

राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर कायम…

राधानगरी – राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचे 5 दरवाजे काल उघडले होते. त्यापैकी आज पहाटे चार वाजून 24 मिनिटांनी एक स्वयंचलित दरवाजा बंद झाला होता. आज दुपारी दोन वाजून 40 मिनिटांनी तीन नंबरचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला असून धरण परिसरात 94 मिलिमीटर पाऊस झाला असल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.

राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले होते. राधानगरी धरण परिसरात काल सायंकाळ पासून पावसाचा जोर कमी झाल्याने त्यापैकी एक स्वयंचलित दरवाजा पहाटे चार वाजून 24 मिनिटांनी बंद झाला होता. पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने आज दुपारी दोन वाजून 40 मिनिटांनी पुन्हा तीन नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. राधानगरी धरणाच्या पाच स्वयंचलित दरवाज्यातून 7140 सी यु एस इ सी तर पावर हाऊस मधून चौदाशे सी यु एस इ सी असा आठ हजार पाचशे चाळीस पाण्याचा विसर्ग भोगावती नदी सुरू असून पाण्याची पातळी 347.20 फूट तर पाणीसाठा ८३०४.०८ दशलक्ष घनफूट असून आजचा पाऊस 94 मिलिमीटर एकूण पाऊस 2376 मिलिमीटर झाला असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.

राधानगरी धरणाचे बुधवारी पाच संचलित दरवाजे खुले झाले होते. त्यामुळे पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत मोठ्या प्रमाणात वाढल्याने पडळी पिरळ शिरगावचा राशिवडे चा छोटा बंधारा पाण्याखाली गेला आहे. व पडळी येथील वाहतूक बंद झाले आहे तरीही पावसाचा जोर वाढत असल्याने भोगावती नदीकाठी असलेल्या शेतामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने संबंधित शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊ नये असे आव्हान तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.