बेरडेवाडीतील विद्यार्थ्यांनी काढली पर्यावरणपूरक वृक्षदिंडी.

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

हरिनामाच्या जयघोषा सोबत घुमला पर्यावरणाचा गजर…

शिराळा – शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बेरडेवाडी येथे सरकारच्या वृक्ष लागवड अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी गावातून वृक्षदिंडी काढली. हाती टाळ, वीणा घेऊन वारकऱ्यांची पांरपरिक वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर केला. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश दिला. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या वृक्षवेली आम्हा सोयरे वनचरे या अभंगावर ताल धरून वृक्षाभोवती विद्यार्थ्यांनी रिंगण घातले व विद्यार्थ्यांनी दुष्काळावर आधारित लघुनाटीका सादर केली यानंतर शाळेच्या आवारात सरपंच बाळाबाई धामणकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच बाळाबाई धामणकर, ग्रामपंचायत माजी सदस्य हसीना मुल्ला, अनिता चौगुले, लक्ष्मी पावसकर, कांता कंदारे, ज्ञानदेव बेरडे, योगिता बेरडे, वनिता बेरडे, नयना बेरडे, आनंदा कंदारे, आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी गावातील, वाड्या वस्त्यावरील प्रत्येक घरासमोर किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला वृक्षदिंडीचे नियोजन मुख्याध्यापक जितेंद्र लोकरे यांनी केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.