कोल्हापूर – WATCH TEAM:
आरोग्य क्षेत्रातील शिस्तबद्ध नियोजन आणि सांघिक प्रयत्नांच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवली आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या (NACO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबविण्यात आलेल्या ‘मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा’ (MAS) अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याने ‘संघर्षशील’ श्रेणीतून थेट ‘सुरक्षित’ श्रेणीत दिमाखदार झेप घेतली आहे. या दैदिप्यमान कामगिरीबद्दल जागतिक एड्स दिनानिमित्त येत्या १ डिसेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांना राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात येणार आहे.

गेल्या ८ महिन्यांच्या अथक परिश्रमांना यश!
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांपासून हे अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आले. केवळ कागदोपत्री काम न करता प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत पोहोचून जिल्ह्यातील एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाने NACO च्या ‘९५-९५-९५’ या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची यशस्वी पूर्तता केली.
काय होते हे ‘९५-९५-९५’ मिशन?
१. एचआयव्ही संसर्गित व्यक्तींपैकी किमान ९५ टक्के व्यक्तींचे अचूक निदान करणे.
२. निदान झालेल्यांपैकी ९५ टक्के रुग्णांना तातडीने ‘अँटी रेट्रोव्हायरल थेरपी’ (ART) उपचारांशी जोडणे.
३. उपचार घेत असलेल्या किमान ९५ टक्के रुग्णांचा विषाणूभार (Viral Load) पूर्णपणे नियंत्रणात आणणे.या तिन्ही आघाड्यांवर कोल्हापूरच्या आरोग्य यंत्रणेने केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली असून, राज्यातील २४ जिल्ह्यांनी ‘सुरक्षित’ श्रेणी गाठल्यामुळे महाराष्ट्र राज्यालाही या मानाच्या श्रेणीत स्थान मिळाले आहे.
पुढचे लक्ष्य आता ‘सुरक्षित प्लस’!
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली. यामध्ये जिल्ह्यातील एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्रे (ICTC), ART उपचार केंद्रे तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे मोलाचे योगदान लाभले आहे. या यशावर न थांबता आता कोल्हापूर जिल्ह्याला ‘सुरक्षित प्लस’ श्रेणीत नेण्यासाठी विशेष नियोजन केले जाणार असल्याचा विश्वास जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी व्यक्त केला आहे.