महाराष्ट्राची सर्वच आघाड्यावर पत घसरत चाललेली आहे.. अशावेळी…वाचा सविस्तर.. जागर! राजकारणात राष्ट्रवादीचा प्रवास कुठे चाललाय?

‘राष्ट्रवादी’चे विलीनीकरण की कालबाह्यकरण…?

महाराष्ट्राच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालबाह्य ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विलीनीकरण करून पक्ष पुन्हा उभा करायचा की कालबाह्य व्हायचे, यापैकी काय स्वीकारायचे याची स्पष्ट भूमिका जर या पक्षाच्या नेत्यांनी घेतली नाही तर तो दिवस दूर नाही. ‘आम्ही कोठे जायचा हा प्रश्न उपस्थित होत नाही, यायचे असेल तर आमच्या सोबत यावे लागेल’ अशी आजवर…

महाराष्ट्राच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालबाह्य ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विलीनीकरण करून पक्ष पुन्हा उभा करायचा की कालबाह्य व्हायचे, यापैकी काय स्वीकारायचे याची स्पष्ट भूमिका जर या पक्षाच्या नेत्यांनी घेतली नाही तर तो दिवस दूर नाही.

  • ‘आम्ही कोठे जायचा हा प्रश्न उपस्थित होत नाही, यायचे असेल तर आमच्या सोबत यावे लागेल’ अशी आजवर शेवटची जाहीर भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्या २४ सप्टेंबर रोजी मांडली होती.
  • विलीनीकरणासंदर्भात काही ठरलं तर त्याची योग्य वेळ येताच माहिती देऊ, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन दिवसापूर्वी स्पष्ट केले आहे..
  • दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्याबरोबर झाली होती. तारीख ही निश्चित ठरली होती. पण त्यांच्या अपघाती मृत्यू बरोबर ती चर्चा तिथेच संपली. आत्ता होणाऱ्या विलीनीकरणाच्या चर्चेचा मला कंटाळा आला आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
  • आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार नाही, हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे अहंकार आहे. भाजपसोबत असताना विलीनीकरणाची चर्चा शक्यच नाही, असे रोखठोक वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

‘पवार इज पॉवर’ असे महाराष्ट्राच्या राजकारणात म्हटले जात होते. त्याच ‘पॉवर’च्या भोवती उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणा संदर्भात चार पवारांनी केलेली ही वक्तव्य आहेत. त्यापैकी शरद पवार यांचे वक्तव्य थोडे जुने असले तर सध्या विविध पदांवर असलेल्या इतर पवारांची वक्तव्य ही ताजी तवानी आहेत. महाराष्ट्राची सद्य राजकीय परिस्थिती, देशातील राजकीय वातावरण आणि जगभरातील घडामोडींचा भारतात होत असलेल्या परिणाम याचा विचार केला तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील विलीनीकरणाच्या चर्चेचा खरेच कंटाळा येण्यासारखी परिस्थिती आहे. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणा पुरताच सीमित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आता विलीनीकरणा ऐवजी तो पक्ष कालबाह्यकरणाकडे झुकत आहे का…? असा प्रश्न मांडून जर विश्लेषण केले तर आपल्या हाती काय लागू शकते?

देशासमोरील राजकीय आव्हाने आणि विरोधी पक्षांनी घ्यायची भूमिका याचा देखील ऊहापोह झाला पाहिजे. तीस वर्षांपूर्वी अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती की, प्रादेशिक पक्षांना खूप महत्त्व आले होते. कारण देशव्यापी जनमताचा आधार असलेल्या काँग्रेस पक्षाला पर्याय देण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नव्हती. तुलनेने अधिक जनाधार असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला पर्याय देण्याचा प्रयत्न चालू होता. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस अंतर्गत नेतृत्व स्पर्धेतून बाजूला पडलेल्या शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना जून १९९९ मध्ये केली होती. काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा पुढे करण्यात आला होता. कालांतराने हे सर्व मुद्दे गळून पडले. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर केवळ पाचच महिन्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात आघाडी करून विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सरकारही स्थापन केले होते.

विरोधी आघाडीची बाजू
महापवार इज पॉवर’ असे महाराष्ट्राच्या राजकारणात म्हटले जात होते. त्याच ‘पॉवर’च्या भोवती उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणा संदर्भात चार पवारांनी केलेली ही वक्तव्य आहेत. त्यापैकी शरद पवार यांचे वक्तव्य थोडे जुने असले तर सध्या विविध पदांवर असलेल्या इतर पवारांची वक्तव्य ही ताजी तवानी आहेत. महाराष्ट्राची सद्य राजकीय परिस्थिती, देशातील राजकीय वातावरण आणि जगभरातील घडामोडींचा भारतात होत असलेल्या परिणाम याचा विचार केला तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील विलीनीकरणाच्या चर्चेचा खरेच कंटाळा येण्यासारखी परिस्थिती आहे. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणा पुरताच सीमित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आता विलीनीकरणा ऐवजी तो पक्ष कालबाह्यकरणाकडे झुकत आहे का…? असा प्रश्न मांडून जर विश्लेषण केले तर आपल्या हाती काय लागू शकते? देशासमोरील राजकीय आव्हाने आणि विरोधी पक्षांनी घ्यायची भूमिका याचा देखील ऊहापोह झाला पाहिजे. तीस वर्षांपूर्वी अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती की, प्रादेशिक पक्षांना खूप महत्त्व आले होते. कारण देशव्यापी जनमताचा आधार असलेल्या काँग्रेस पक्षाला पर्याय देण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नव्हती. तुलनेने अधिक जनाधार असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला पर्याय देण्याचा प्रयत्न चालू होता. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस अंतर्गत नेतृत्व स्पर्धेतून बाजूला पडलेल्या शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना जून १९९९ मध्ये केली होती. काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा पुढे करण्यात आला होता. कालांतराने हे सर्व मुद्दे गळून पडले. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर केवळ पाचच महिन्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात आघाडी करून विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सरकारही स्थापन केले होते.राष्ट्रातील आघाडीच्या सरकारने सलग तीन वेळा सत्ता स्थापन केली आणि पंधरा वर्षे राज्यकारभार चालवला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये सत्तांतर घडवून आणल्यानंतर देशाच्या आणि विविध राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलत गेली ती अजूनही पूर्ण बदललेली नाहीत. काही राज्ये अद्यापही त्यापासून दूर आहेत. दरम्यान भाजपच्या प्रभावालाच ओहोटी लागून गेल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले नाही. याउलट काँग्रेस पक्षाला शंभर जागा मिळून विरोधी आघाडीची बाजू भक्कम झाली.

प्रादेशिक पक्षांची भूमिका अजूनही निर्णय ठरू शकते, अशी परिस्थिती असली तरी महाराष्ट्रापुरते विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल ज्या पद्धतीने झाली ती पाहता आता या पक्षाला भवितव्य राहिले आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे वयोमान पाहता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये खूप आदळ आपट करून देखील स्पष्ट बहुमतापर्यंत जाता आलेले नाही. पर्यायने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पाडून जे राजकारण घडविले गेले त्यातून भारतीय जनता पक्ष पिछाडीवर गेला. मात्र या पक्षाचे नुकसान तुलनेने कमी झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र कालबाह्य होण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत.

चर्चेला पूर्णविराम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूट ही शरद पवार यांच्या राजकीय वारसदारांची फूट होती. तुलनेने शिवसेनेची परिस्थिती वेगळी होती आणि आजही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सत्तेत वाटा मिळाल्यामुळे तो अधिक प्रभावी ठरला. या पक्षाची स्थापना आणि महाराष्ट्रातील राजकारणाची गरज या दोन्हीला मर्यादा आल्यामुळे पक्ष वाढ तर थांबलीच होती. अशा परिस्थिती मध्ये सर्व पवार मंडळींना राजकारण करणे अडचणीचे ठरत असावे, यातूनच दोन्ही राष्ट्रवादी गटांचे पिलीनीकरण करावे अशी चर्चा सुरू झाली. ती चर्चा सुप्रिया सुळे यांच्या मतानुसार अजित पवार हयात असेपर्यंत चालू होती त्यांच्या मृत्यू बरोबर त्या चर्चेला देखील पूर्णविराम मिळाला.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येणार असतील आणि राज्य तसेच देशपातळीवर भाजप विरोधी असलेल्या इंडिया आघाडीशी संबंध कसे ठेवणार यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपबरोबर शरद पवार जाणार का याचे उत्तर अद्यापही मिळत नाही. गेल्या २४ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी आम्ही कोठे जायचा प्रश्न उपस्थित होत नाही, यायचे असेल तर आमच्या सोबत यावे लागेल, असे म्हटले होते. याचा अर्थ अजित पवार यांच्या गटाने विलीनीकरणाची तयारी दाखवावी आणि ते करीत असताना भाजपची साथ सोडावी लागेल अशी अपेक्षा शरद पवार यांना आहे का? या प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत. त्यांच्या आठ खासदार आणि दहा आमदारांपैकी बहुसंख्य जणांना भाजप सोबत जायला उत्सुक असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांनी ती उघड भूमिका घेतलेली नाही. ते सर्व आम्ही शरद पवार यांच्या सोबत आहोत एवढेच मोघम उत्तर देतात.

रोहित पवार यांनी मात्र राजकीय कार्यक्रमाच्या पातळीवर आणि जाहीर भूमिकेच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे की, विलीनीकरणाची चर्चा तर नाहीच आणि भाजपसोबत असताना विलीनीकरण होण्याची चर्चा शक्यच नाही. ही त्यांची भूमिका राजकीय दिशा स्पष्ट करणारी दिसते. भाजपसोबत न जाता राजकारण करायचे असेल तर त्या विलीनीकरणाला अर्थ आहे असेच त्यांना सूचित करायचे आहे. शरद पवार यांच्या ‘पॉवर’ला येत असलेल्या मर्यादा आणि त्यांची जागा घेण्याची शक्यता असलेले अजित पवार आज हयात नसल्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यास रोहित पवार यांना संधी दिसते. ती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कितपत उपयुक्त ठरेल, हा खरा प्रश्न आहे.असे त्यांच्या वक्तव्यावरून वाटते.

काँग्रेस हाच पर्याय
महाराष्ट्रातील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक वातावरण ज्या प्रकारे अस्थिरतेकडे झुकते आहे. याउलट देशपातळीवर सत्ताधारी भाजप आघाडीला पर्याय देण्याच्या स्थितीकडे झुकते आहे, अशा विरोधाभासी परिस्थितीमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस भूमिका घेणार नसेल तर तो कालबाह्यकरणाकडे वाटचाल करीत आहे, असाच निष्कर्ष निघू शकतो. प्रादेशिक पक्षांची गरज आणि भूमिका अद्याप पूर्णपणे संपलेली नसली तरी भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पातळीवरील पर्याय आहे हे मात्र स्पष्ट दिसते आहे. जनता त्याचाच विचार करणार आहे. जरी उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल तसेच आंध्र प्रदेश,ओडिशा आदी राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती खराब असली तरी राष्ट्रीय पातळीवर पर्याय देण्यासाठी प्रादेशिक पक्षांची आघाडी देखील कमकुवतच ठरणार आहे.

अशावेळी महाराष्ट्र सारख्या महत्त्वाच्या मोठ्या राज्यातील प्रादेशिक पक्षांनी (दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांनी) स्पष्ट भूमिका घेतली नाही तर भाजपचे बटीक म्हणून दिवस काढावे लागतील. आणि त्यांना बटीक बनवण्याची भूमिका भारतीय जनता पक्ष कदापिही बदलणार नाही. ” दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यायचे म्हणजे काय हे ठरवण्याचा अधिकार आमच्याकडे आहे” अशा स्वरूपाचे वक्तव्य मुख्यमंत्री करतात हा त्याचा अर्थ आहे. इतकेच नव्हे तर अजित पवार गटातील तंठे बखेडे सोडवण्याची विनंती करण्यासाठी या पक्षाचे स्वतःला ज्येष्ठ आणि अनुभवी नेते मानतात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडतात. त्यांच्या चेहऱ्यावरील केविलवाणी झालेली छटा पाहवत नव्हती.

अशा सर्व परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने इंडिया आघाडी अर्थात काँग्रेस बरोबर कायम राहायचे की भाजपचे मांडलिकत्व स्वीकारायचे याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा अनेक प्रदेशातील प्रादेशिक पक्ष कालबाह्य होत चालले आहेत आणि देशाचे राजकारण देखील त्याच वळणावर येऊन ठेपत आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस देखील कालबाह्य ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विलीनीकरण करून पुन्हा एकदा ठामपणे उभे राहायचे याचा निर्णय घ्यावा लागेल आणि आता कालबाह्य होण्याची शक्यता आहे. यापैकी काय स्वीकारायचे याची स्पष्ट भूमिका जर या पक्षाच्या नेत्यांनी घेतली नाही तर तो दिवस दूर नाही.

महाराष्ट्र राज्याची वाटचाल या राज्याची स्थापना झाल्यापासून सुनियोजित आणि ठाम धोरणावर होत आलेली आहे अशा या उत्तम स्थितीतील महाराष्ट्राची सर्वच आघाड्यावर पत घसरत चाललेली आहे. अशावेळी भक्कम, सक्षम आणि कार्यक्षम विरोधी पक्षाची उणीव जाणवते आहे. ती भरून काढण्याची संधी प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेकडे होती. पण त्या पक्षांनी गट तटाच्या विभागणीमध्ये गमावली आहे. लोकांच्या अनेक प्रश्नांवर विविध संघटना आणि राजकीय गट सरकार विरुद्ध संघर्ष करीत आहेत. लोकांच्या असंतोषाला वाट करून देत आहेत. अशावेळी विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याची जबाबदारी देखील या पक्षांना नको आहे. राजकीय लागेबांधे सांभाळण्यामध्ये या पक्षांचे नेते दंग झाल्यामुळे ते देखील कालबाह्यच ठरणार आहेत.

मागील जागर वाचण्यासाठी या लिंकला क्लिक करा…

गोकुळ सारखा ब्रँड उभारून दाखवावा…. !! जागर!!