वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाशी नाते!

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

 

१५ ऑक्टोबर विशेष संपादकीय-लेखक : रमेश कृष्णराव लांजेवार

आज १५ ऑक्टोबर हा भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना, आजच्या डिजिटल युगात पुस्तकांशी नाते अधिक दृढ करण्याची गरज आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे अनेकांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असला, तरी त्याचा अतिरेक टाळणे महत्त्वाचे आहे. मोबाईलवर वेळ घालवण्याबरोबरच दररोज काही वेळ पुस्तकांच्या वाचनासाठी दिला, तर ज्ञान, विचारशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते.

डॉ. कलाम यांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी प्रेरणादायी आहे. ज्ञानाची ओढ, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या बळावर माणूस मोठी स्वप्ने पाहू शकतो आणि ती प्रत्यक्षात आणू शकतो, हा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुस्तकांचे वाचन करणे, ही त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल.

वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाढदिवस, सण आणि अन्य विशेष प्रसंगी भेटवस्तूंसोबत पुस्तक देण्याची परंपरा सुरू करायला हवी. विद्यार्थ्यांनी पुस्तकांबरोबरच वृत्तपत्रांचेही नियमित वाचन करावे. शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत.

ज्ञानाचा विकास आणि निसर्गाचे संवर्धन या दोन्ही गोष्टी समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत. म्हणूनच वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक वाचनासोबत वृक्षारोपणासारखे उपक्रमही राबविणे उपयुक्त ठरेल.

चला, मोबाईलच्या स्क्रीनपलीकडे जाऊन पुस्तकांच्या विश्वाशी मैत्री करूया. वाचनाची सवय जोपासूया आणि ज्ञानसमृद्ध समाज घडवूया.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना वाचन प्रेरणा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक : रमेश कृष्णराव लांजेवार
(स्वतंत्र पत्रकार, नागपूर)

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.