पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते २१५ ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त साहित्याचे वाटप

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

ज्येष्ठांच्या सन्मानासाठी समाजहिताचा उपक्रम; लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गारगोटी प्रतिनिधी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते २१५ ज्येष्ठ नागरिकांना विविध उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठांच्या सन्मानासह त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले, ज्येष्ठ नागरिक हे आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि अनुभवाचे समृद्ध भांडार आहेत. आज आपण जे काही आहोत, त्यामागे त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांचा आणि त्यागाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या सन्मानाची आणि सेवाभावाची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. आज २१५ ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त साहित्याचे वाटप करताना मला विशेष आनंद होत आहे. हा केवळ साहित्य वाटपाचा कार्यक्रम नसून आपल्या ज्येष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. राज्य शासन ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवत आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला सन्मानाने, सुरक्षितपणे आणि निरोगी आयुष्य जगता यावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी कल्याणराव निकम, सभापती विक्रम भाऊ पाटील, सूर्याजी देसाई, मदनदादा देसाई, अशोकराव भांदिगरे, संतोष शिंदे (पुष्पनगर), वीरेंद्र देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर परीट यांनी केले. या उपक्रमातून २१५ ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्याचा लाभ मिळाला. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, लाभार्थी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.