‘गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजरा

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

वृक्षारोपण, सहकार विषयावरील व्याख्यानातून अधिकारी – कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या आवाहनानुसार दि. २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित सहकार सप्ताह तसेच दि.०४ जुलै रोजीचा आंतरराष्ट्रीय सहकार दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या “सहकारातून समृद्धी” या संकल्पनेला अनुसरून पर्यावरण संवर्धन, सहकाराची मूल्ये, कर्मचारी विकास आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्यात आले.

सहकार सप्ताहानिमित्त गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या प्रांगणात औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. गोकुळचे प्रशासक प्रदीप मालगावे व सागर बलकवडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. तसेच गोकुळचे प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव, गोगवे, बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी या शीतकरण केंद्र व सॅटेलाईट डेअरी उदगाव (शिरोळ), पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी तसेच कागल येथील प्रकल्प परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी प्रशासक सागर बलकवडे म्हणाले, “सहकार ही केवळ संस्था चालविण्याची संकल्पना नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. सहकार सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेले उपक्रम पर्यावरण संवर्धनाबरोबरच सहकाराची मूल्ये अधिक मजबूत करण्यास मदत करतील. भविष्यातही गोकुळच्या माध्यमातून असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

सहकार सप्ताहानिमित्त संघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा.डॉ.अनिल कारंजकर यांचे “सहकार व्यवस्थापन व त्यापुढील आव्हाने” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. बदलत्या काळात सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने, प्रभावी व्यवस्थापन, संस्थेची कार्यपद्धती आणि कर्मचारी यांची भूमिका याविषयी त्यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. तसेच संस्था, सहकार आणि कर्मचारी यांच्यातील विश्वास व समन्वय अधिक मजबूत असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व उपक्रमांना अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वृक्षारोपण, मार्गदर्शनपर व्याख्यान या उपक्रमांच्या माध्यमातून सहकाराची मूल्ये अधिक बळकट करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला.

यावेळी संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे प्रा. डॉ. अनिल कारंजकर, आनंद यादव, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, संघाचे अधिकारी हिमांशू कापडिया, बाजीराव राणे, डॉ.दयावर्धन कामत, सुधाकर पाटील, डॉ. विजय मगरे, उदय पाटील, भरत मोळे, प्रताप पाटील, अमोल गडकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.