कोल्हापूर जिल्हा सोशल मिडिया पदाधिकारी आढावा बैठक… नवीन नियुक्त्यांसह क्यू आर कोड च्या अनावरण
कोल्हापूर (विनायक जितकर) – शिवसेना सोशल मिडिया पश्चिम महाराष्ट्र संवाद दौऱ्या अंतर्गत कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी आढावा बैठक सोशल मिडिया पश्चिम महाराष्ट्र प्रमुख महादेव सलवदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, युवानेते विक्रम आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीत जिल्ह्यातील सोशल मिडियाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळातील संघटन विस्तार, जनसंपर्क मोहीम आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात आले.
बैठकीत प्रत्येक तालुक्यात सोशल मिडियाचे नेटवर्क अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. पक्षाच्या विविध उपक्रमांची माहिती अधिक वेगाने आणि प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, अधिकृत माहितीचा प्रसार करणे तसेच सोशल मिडियावर सकारात्मक आणि तथ्याधारित संवाद वाढविण्याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सोशल मिडीयाच्या विविध पदावरील नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच सोशल मिडिया विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध शासकीय योजनाची माहिती देणाऱ्या QR कोड चे अनावरण करण्यात आले. तसेच आगामी कार्यक्रम, संघटनात्मक उपक्रम तसेच डिजिटल माध्यमातून जनसंपर्क अधिक व्यापक करण्यासाठी आवश्यक जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून कोल्हापूर जिल्ह्यात सोशल मिडिया संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीला नगरसेविका मंगल साळोखे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सौरभ कुलकर्णी, उपसमन्वयक भूषण सुर्वे, संपर्कप्रमुख संग्राम पाटील, जिल्हाप्रमुख जयवंत बरगे,जिल्हा समन्व्यक अमोल नवले,युवासेना शहरप्रमुख मंदार पाटील, युवतीसेना शहरप्रमुख सौ. नम्रता भोसले,उपजिल्हाप्रमुख सोशल मिडिया संतोष साबळे, राधानगरी विधानसभा प्रमुख विनायक जितकर, भुदरगड तालुकाप्रमुख सुनील रेडेकर, हातकणंगले लोकसभा संपर्कप्रमुख ओंकार कोळी, शहर समन्वयक स्वराज पाटील, दक्षिण विधानसभा प्रमुख अथर्व नागवेकर, शहरप्रमुख सिद्देश देसाई, गारगोटी शहरप्रमुख निलेश सुतार, युवतीसेनेच्या निवेदिता तोरस्कर, साक्षी पाटील, युवासेनेचे अक्षय पाटील, शुभम शिंदे यांच्यासह पदाधिकारी, सोशल सैनिक उपस्थित होते.












































































