आंबेडकरी चळवळीतील विचारवंत प्रा. डॉ. विजय काळेबाग यांचे निधन 

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

डॉ. विजय काळेबाग यांचे आयुष्यभर मानवतावादी आणि समतावादी विचारधारा जोपासण्याचे कार्य

कोल्हापूर – फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, उत्तम वक्ते ,आणि महाराष्ट्रातील सामाजिक घडामोडींचे भाष्यकार प्रा. डॉ. विजय काळेबाग सर यांचे काल दिनांक 7 जून 2026 ई . रोजी वयाच्या 58 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांचे मुळ गाव येडे उपाळे ता. कडेगाव जिल्हा सांगली असून ते कोल्हापुर येथील भोगावती महाविद्यालय कुरुकली, कोल्हापूर येथे वरिष्ठ विभागाकडे इंग्रजी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने फुले, शाहू,आंबेडकरी, परिवर्तनवादी चळवळीचे आणि काळेबाग कुटुंबीयांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. आंबेडकरी चळवळीतील एक कृतिशील विचारवंत आणि व्यवस्था परिवर्तनाचा आग्रह धरणारे डॉ. विजय काळेबाग यांनी आयुष्यभर मानवतावादी आणि समतावादी विचारधारा जोपासण्याचे कार्य केले आहे. ग्रामीण व शहरी समाजाचे सातत्यपूर्ण प्रबोधन केले आहे. अनेक सामान्य व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यानी स्वतःला वाहून घेतले होते.

डॉ. विजय काळेबाग यांचे मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आहे. अरुण शौरीचे सनातनी कारस्थान, बळी (इंग्रजी अनुवादित नाटक) संविधानाचे विरोधक अर्थात भारतीय लोकशाहीचे मारेकरी, ही त्यांची प्रसिध्द व गाजलेली ग्रंथ संपदा आहे. त्यानी संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक साहित्य संमेलने, चर्चासत्रे, विविध परिषदांचे अध्यक्षीय स्थान भूषविलेले होते. रिडल्स प्रकरण, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, कोल्हापुर येथील वडणगे मातंग समाजावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन, अलीकडील संविधान सन्मान मोर्चामध्ये सक्रीय सहभाग राहिला होता. डॉ. विजय काळेबाग सर यांच्या निधनाने फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कोल्हापूर येथे दिनांक 12 जून 2026 ई. रोजी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.