उद्योजकांना कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण
कोल्हापूर – Punjab National Bank च्या मंडल कार्यालय, कोल्हापूर अंतर्गत २७ एप्रिल २०२६ रोजी एमएसएमई आउटरीच कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम इचलकरंजी, सोलापूर तसेच पणजी येथे एकाच वेळी पार पडला.
इचलकरंजी येथे आयोजित कार्यक्रमात “द इचलकरंजी पावरलूम असोसिएशन”चे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, उपाध्यक्ष रफीक खानापुरे, पीएनबी एमडी सचिवालय, दिल्ली येथील उपमहाप्रबंधक के. राजागोपाल, मंडल प्रमुख राजीव कुमार राय (उपमहाप्रबंधक), उप मंडल प्रमुख दिनेश कुमार पांडेय (सहायक महाप्रबंधक) तसेच शाखा प्रमुख राजेश चव्हाण उपस्थित होते.
सोलापूर येथे जिल्हा यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पी. गड्डम, उप मंडल प्रमुख मंगलेश मुकुल (सहायक महाप्रबंधक) आणि शाखा प्रमुख त्रुषांत हुलके यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तर पणजी (गोवा) शाखेत सीएसी प्रमुख राजीव जिंदल (सहायक महाप्रबंधक), पीएलपी प्रमुख जगत पात्रा (सहायक महाप्रबंधक) तसेच शाखा प्रमुख कुलबीर (मुख्य प्रबंधक) यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम पीएनबीचे एमडी व सीईओ अशोक चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी उद्योजकांना बँकेच्या डिजी लोन उत्पादने, डिजी एमएसएमई कर्ज योजना, विविध सॅलरी अकाउंट योजना तसेच एमएसएमई क्षेत्राशी संबंधित विशेष योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच अनेक उद्योजकांना कर्ज मंजुरी पत्रांचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान एकूण ₹१३१.२० कोटींच्या ८३ लीड्स प्राप्त झाल्या असून, त्या निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी पीएनबीकडून प्राधान्याने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.























































