B ALERT लाईट गेल्यावर लगेच ही कृती करू नका.. नाहीतर तुमच्यामुळे जाऊ शकताे.. एकाद्याचा बळी!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अशा वेळी सर्वप्रथम घराजवळचा वायरमन आठवतो आणि आपण लगेच मोबाईल हातात घेऊन त्याला कॉल करतो. पण आता ही सवय बदलण्याची गरज आहे. कारण तुमचा एक फोन, तुमच्यासाठीच सेवा देणाऱ्या वीज कर्मचाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे क्षणभर स्वतःला सावरून विचार करा… आणि मगच योग्य पद्धतीने कृती करा.

 

कोल्हापूर- परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना थेट फोन करण्याच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. दुरुस्तीच्या कामावेळी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लक्ष तांत्रिक बाबींवर केंद्रित असणे आवश्यक असते. अशावेळी फोन आल्यास त्यांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका वाढतो.
यासाठी वीज गेल्यानंतर तातडीने फोन करण्याऐवजी किमान १० ते १५ मिनिटे प्रतीक्षा करावी. त्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी अधिकृत पर्यायांचा वापर करावा, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

ही बातमीही जास्त वाचली गेली..– जनसंपर्कातील ‘गोल्डन अवर’ ओळखा! पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन.

ग्राहकांसाठी २४ तास कार्यरत असलेले १८००-२३३-३४३५, १८००-२१२-३४३५ आणि १९१२ हे टोल-फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. तसेच ९१६७७७७७२१ या क्रमांकावर ‘Hi’ असा संदेश पाठवून व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार नोंदवता येते. मोबाईल अॅप, एसएमएस आणि मिस कॉल सुविधांचाही वापर करता येतो.
अधिकृत प्रणालीद्वारे तक्रार नोंदवल्यास ती तातडीने संबंधित विभागाकडे पोहोचते आणि वीजपुरवठा लवकर सुरळीत होण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे वीज कर्मचाऱ्यांची सुरक्षितता अबाधित राहते.वीज आली नाही म्हणून घाई करू नका; योग्य मार्गाचा अवलंब करा. कारण थोडा संयम आणि योग्य निर्णय एखाद्याचा जीव वाचवू शकतो, असा संदेश महावितरणने दिला आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.