पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून जिल्हा प्रमुखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
मुंबई, प्रतिनिधी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सहपरिवार ‘मातोश्री’ येथे जाऊन पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतले.
या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व पुढील राजकीय वाटचालीस देखील शुभेच्छा दिल्या. तसेच पक्षवाढी आणि संघटन बळकटीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. भेटीदरम्यान कुटुंबीयांचीही उपस्थिती होती. अत्यंत आपुलकीच्या वातावरणात झालेल्या या भेटीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्ष वाढीसाठी बूथस्तरावर संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांची व युवक व महिला आघाडी सक्रिय करणे, तसेच ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार करण्यावर विशेष भर देण्याचे मार्गदर्शन ठाकरे यांनी केले. कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढवून पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, असेही त्यांनी सांगितले.
























































