सोनाळीचा दीपक देसाई स्पोर्ट्स ठरला GPL चा मानकरी 

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

रांगणा स्पोर्ट्स बरोबर झालेल्या अंतिम सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा शिगेला… विजेत्या संख्या चकष प्रदान करताना प्रा.अर्जुन आबिटकर सोबत मान्यवर.

गारगोटी प्रतिनिधी – संपूर्ण तालुक्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या भुदरगड प्रेमिअर लीगच्या (GPL) रोमहर्षक अंतिम सामन्यात दीपक देसाई स्पोर्ट्स, सोनाळीने GPL चषक जिंकला. या स्पर्धेतील अंतिम सामना दिपक देसाई स्पोर्टस विरुद्ध रांगणा स्पोर्ट्स, भटवाडी या संघांमध्ये रंगला. शेवटच्या षटकापर्यंत चाललेला हा सामना सर्व प्रेक्षकांसाठी लक्षवेधी ठरला. 

कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय नामांकित व क्रीडारासिकंच्या मनावर अधिराज्य गाजवणारी स्पर्धा म्हणून GPL ओळखली जाते. GPL चे हे १७ वे वर्ष असून यावर्षी तब्बल २० संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. सलग १५ दिवस सुरु असलेली ही स्पर्धा असून अतिशय नियोजनबद्ध स्पर्धा पार पडली. सुपर 8 नंतर या सामन्याची उत्सुकता वाढत गेली. डे नाईट सामने असल्याने रात्री प्रकाशझोतात प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दहा हजार प्रेक्षकांच्या साथीने अंतिम मुकाबला पार पडला. स्पर्धेतील विजेत्या संघांना रुपये १ लाख बक्षीस देण्यात आले. द्वितीय क्रमांकास ७५ हजार तर उत्तेजनार्थ ११ हजार अशी पारितोषिके देण्यात आली.

यावेळी के.डी.सी.सी. बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर, गोकुळ दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, माजी सभापती बाबा नांदेकर, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक दत्तात्रय उगले, विष्णू केसरकर, भुदरगड तालुक्याचे सभापती विक्रमसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य धनंजय लाड, अशोक भांदीगरे, प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, अंकुश चव्हाण, अजित पाटील, तानाजी जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी GPL कमिटीचे अध्यक्ष बाजीराव चव्हाण, मनोज परीट, विजय सारंग, गजानन शिंदे, सुरेश चव्हाण, सुशांत गुरव, अरुण शिंदे, चंद्रकांत गोरे, दीपक देसाई, एस. के. शिंदे, सागर शिंदे, महेश पवार, रणधीर शिंदे, संजय चिले, संजय पाटील, शंभु चिले, गिरी, रणवीर चव्हाण, नामदेव सावंत, संदीप देसाई आदींनी परिश्रम घेतले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.