महावितरणच्या विविध कामांचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्या (दि. १९ एप्रिल) रोजी लोकार्पण

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नव्याने पूर्ण झालेल्या कामांतून ३०७८ शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

कोल्हापूर – महावितरणने वीज ग्राहकांच्या सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या दृष्टीने गारगोटी व राधानगरी उपविभागात विविध कामे केली आहेत. या कामांचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या (दि. १९ एप्रिल) रोजी करण्यात येत आहे. मुदाळ तिट्टा (ता. भुदरगड) येथे सकाळी ०९.३० वाजता व कडगाव उपकेंद्र, तिरवडे (ता. भुदरगड) येथे सकाळी १०.३० वाजता हे कार्यक्रम होणार आहेत.

राज्य शासनाकडून नागरिकांचे व प्रामुख्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबवण्यात येत आहेत. या योजनेतून महावितरणनेगारगोटी व राधानगरी तालुक्यात अनेक कामे केली आहेत. यामधील मुदाळ तिट्टा उपकेंद्राची पाच एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसवून क्षमता वाढ करण्यात आली आहे तर कडगाव उपकेंद्र, तिरवडे येथे चार मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या दोन्ही कामांचे लोकार्पण पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या (दि. १९ एप्रिल) होणार आहे.

मुदाळतिट्टा उपकेंद्राची पाच एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसवून क्षमता वाढ करण्याकरता १.४० कोटींचा खर्च आला आहे. यामुळे १३ गावांतील १५६८ शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. तर कडगाव उपकेंद्र, तिरवडे येथे चार मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्याकरता सुमारे १४ कोटींचा खर्च आला आहे. या उपकेंद्रातून २२ गावांतील १५१० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. या दोन्ही लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमांस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महावितरण ने केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.