डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी 50 हजारचे सीड फंडिंग

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

शिवाजी विद्यापीठ आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय क्रमांक 

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील विद्यार्थ्यांच्या ‘सोनिक शील्ड’ नावीन्यपूर्ण स्टार्टअप कल्पनेला शिवाजी विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. या स्टार्टअपसाठी 50 हजार रुपयांचे सीड फंडिंग प्राप्त झाले आहे. 

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे इंटरनॅशनल अकॅडेमिया–इंडस्ट्री–गव्हर्नमेंट कॉन्क्लेव्ह (आयएआयजीसी २.०) चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी नाविन्यपूर्ण स्टार्टअप कल्पना मांडल्या. यामध्ये या परिषदेत ‘शार्क टॅंक कम हॅकॅथॉन’ स्पर्धेअंतर्गत आयटी आणि उदयोन्मुख गटात डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या एआय-एमएल विभागच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी प्रणव प्रदीप यादव , योगेश वैजनाथ अंकम आणि जैद मज्जीद शेख यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

ही स्पर्धा विज्ञान, अभियांत्रिकी, आरोग्य व शेती क्षेत्रातील नवकल्पना, स्टार्टअप्स आणि ट्रेंड्स यांवर आधारित असून “विकसित भारत २०४७” या संकल्पनेशी निगडित होती. स्टार्टअप संकल्पनेतील नावीन्य, सर्जनशीलता आणि उद्योजकीय दृष्टिकोनामुळे त्यांची निवड करण्यात आली. या सीड फंडिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्टार्टअप कल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील आणि प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.