दानोळीत २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; तरुण व्यावसायिकाचा खून उघड, परिसरात खळबळ 

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

आरोपींना कठोर शिक्षा करण्याची ग्रामस्थांकडून मागणी

अकिवाट प्रतिनिधी (सचिन मठपती) – दानोळी ता. शिरोळ येथील तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय ४०) यांच्या अपहरण प्रकरणाने भीषण वळण घेतले आहे. २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्यानंतर त्यांचा खून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेने दानोळी व परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी भरतेश यांचे अपहरण केले होते. अपहरणानंतर त्यांच्या मोबाईलवरूनच चुलत भावाला फोन करून २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. अपहरणकर्त्यांनी दोन वेळा पैसे आणण्याचे ठिकाण बदलले. भरतेश यांचे दोन मित्र आणि भाऊ महावीर हे सांगितलेल्या ठिकाणी गेले असता पुन्हा फोन आला; मात्र काही वेळात मोबाईल बंद झाला. दरम्यान, पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी स्वतः शोधमोहीम सुरू केली. शहरीमळा रस्त्यालगत उसाच्या शेतात भरतेश यांची गाडी, चप्पल तसेच दुसऱ्या व्यक्तीचा मफलर आणि नाईट बूट आढळून आले. घटनास्थळी सापडलेल्या या वस्तूंवरून पोलिसांनी संशयाच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेतले.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने काल रात्री 9 वाजता जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी सुरुवातीला केवळ मिसिंगची नोंद करून “उद्या पाहू” अशी भूमिका घेतली, पोलीसानी वेळी दखल घेतली असती तर भरतेश वाचला असता असा सुर ग्रामस्थांमधुन होत आहे.

चौकशीदरम्यान या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले असून भरतेश टोपगोंडा यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयित आरोपीकडून अधिक माहिती घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या घटनेमुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनेस्थळी धावघेत माहिती घेतली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.