डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे शनिवारी ‘अर्थ अवर’चे आयोजन

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

कोल्हापूर शहरांमधील स्ट्रीट लाईट्स १ तास रहाणार बंद

कसबा बावडा – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना वतीने शनिवारी (दि. २८) ‘अर्थ अवर’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या दिवशी रात्री १ तास विजेची उपकरणे बंद ठेवून वीज बचत व पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोल्हापूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे.

याबाबत प्राचार्य डॉ. संतोष चेडे, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा.योगेश चौगुले व डीन स्टुडंट्स अफेअर डॉ. राहुल पाटील यांनी माहिती दिली. उपक्रमाचे समन्वयक प्रा. योगेश चौगुले म्हणाले, शनिवारी कोल्हापूर शहरातील आय.आर.बी.अंतर्गत बल्ब, हायमास्ट दिवे व एल.ई.डी. असे ३०,००० हून अधिक पथदिवे शनिवारी, सायंकाळी ७:३० ते ८:३० या वेळेत बंद राहणार आहेत. तसेच डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे शाहू समाधी स्थळ येथे रात्री ७:३० वा. पणत्यांपासून ‘अर्थ अवर’चा ६०+ हा लोगो तयार करण्यात येणार आहे. ‘अर्थ अवर २०२६’मध्ये शहरात पथदिवे, घरगुती बल्ब बंद ठेवून      

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

नागरिकांनाही यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी एन. एस. एस. विद्यार्थी विशेष परिश्रम घेत आहेत.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.