अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (१.५०) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा
मुंबई – रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने दीड (१.५०) लाख रुपया पर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क (cashless) उपलब्ध करून देण्या-या “पीएम-राहत” योजनेच्या प्रभावी अमलबजावणीत राज्य आरोग्य हमी सोसायटीची भुमिका महत्वाची असुन, रूग्णाला “गोल्डन अवर” मध्ये तातडीचे उपचार देवून मृत्यूदर कमी करण्यास वाचनबद्ध व्हावे असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी मंत्रालयात आयोजित जनआरोग्य योजनेच्या बैठकीत केले आहे.
केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी “Prime Minister – Road Accident Victims Hospitalisation and Assured Treatment (पीएम -राहत ) योजना आणली आहे. या योजने अंतर्गत “आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” व “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना” अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातील कोणत्याही रुग्णालयात दाखल झालेल्या अपघातग्रस्तांना तातडीने ७ दिवसांपर्यंत दीड (१.५०) लाख रुपया पर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क (cashless) देण्यात येणार आहेत. अनेकदा अपघात झाल्यावर आर्थिक अडचणींमुळे उपचारास विलंब होतो. वेळेत उपचार मिळत नाहीत. “पीएम-राहत” योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास अपघाती मृत्युचे प्रमाण कमी होईल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
पीएम -राहत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्य आरोग्य सोसायटीच्या प्रशासनाची भुमिका महत्वाची असुन, रूग्णाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी अंगीकृत रुग्णालयात दाखल करणे. पोलिसांकडून अपघाताची खात्री करून उपचारांना मान्यता देणे, PM-RAHAT योजनेअंतर्गत उपचारास मंजूरी देणे व मंजूर दावे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सादर करण्याची आरोग्य सोसायटीची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात (पीएम -राहत ) योजना राबवण्यासाठी परिवहन विभागाच्या अखत्यारीतील “राज्य रस्ते सुरक्षा परिषद” ही नोडल एजन्सी नियुक्त करण्यात आली असुन, योजनेची अंतिम देयके परिवहन विभागामार्फत दिली जातात.
रस्ते अपघातानंतर 24 तासांच्या आत रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व अपघातग्रस्त भारतीय तसेच परदेशी नागरिकांनाही “पीएम राहत” योजनेचा याचा लाभ मिळणार आहे. उपचार खर्च अपघाताच्या तारखेपासून कमाल 7 दिवसांपर्यंत कव्हर केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत डिझिग्नेटेड व नॉनडिझिग्नेटेड रुग्णालयांमध्येही उपचार करता येणार आहेत. PMJAY व MJPJAY व PM RAHAT योजनेत सामाविष्ट अंगीकृत रुग्णालये ही DESIGNATED रुग्णालये आहेत. या व्यतिरिक्त सर्व रुग्णालये NONDESIGNATED रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयात अपघात ग्रस्त रुग्णास STABILAIZATION TREATMENT देणे अपेक्षित आहे. STABILIZATION TREATMENT नंतर रुग्णास पुढील उपचारांसाठी DESIGNATED अंगीकृत रुग्णालयात शिफ्ट करणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 या Emergency Response Support System (ERSS) क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच या योजनेचे माहिती सर्व नागरिकापर्यन्त पोहचवावी असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
या बैठकीला आरोग्य सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणासाहेब चव्हाण, नागरी आरोग्य अभियान आयुक्त सुनील भोकरे, जन आरोग्य योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानंद जगताप, आरोग्य विभागाच्या सह संचालिका डॉ. सुनीता गोल्हाईत व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.



















































