जातीपातीच्या पलीकडे जगाची ज्ञानयुक्त वाटचाल – प्रोफेसर डॉ. मिलिंद वाटवे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मविप्र केटीएचएम महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय परिसंवाद संपन्न

नाशिक – सध्याचे संशोधन समाजोपयोगी असावे आणि त्याचा उपयोग सामान्य माणसाला होणे आवश्यक आहे. जातीपातीच्या बुरसटलेल्या विचारांच्या पलीकडे ज्ञानाची मुक्त वाटचाल जगभर सुरू आहे. संशोधनासाठी कोणतेही वय, लिंग, जातपात, धर्म, प्रांत, पार्श्वभूमी किंवा ठराविक निकष बंधनकारक नसतात. जिज्ञासा, निरीक्षणशक्ती आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची तयारी असेल, तर कोणीही संशोधन करू शकतो. ज्ञानाची शोधयात्रा ही सर्वांसाठी खुली आहे आणि जातीपातीच्या पलीकडे जात भेदभाव न करता प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार त्यात मानव कल्याणासाठी शिक्षण योगदान दयावे असे प्रतिपादन आयसर संस्था, पुणे येथील सेवानिवृत्त प्रोफेसर डॉ. मिलिंद वाटवे यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या के. टी. एच. एम. कला, वाणिजय व विज्ञान महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसीय “Cutting-Edge Research and Innovative Practices: Bridging Research and Innovation for a Sustainable Future” या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी विशेष वक्ते म्हणून उपस्थितांना दिशा देणारे मार्गदरशन ते करीत होते. जातीपातीचे राजकारण करीत भेदभाव करणारे काळाच्या ओघात कुठे संपले याची दखल देखील समाज घेणार नाही इतक्या वेगाने जग बदलते आहे असे ही ते म्हणाले. मविप्रच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

या परिसंवादाचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक समाजाचे नाशिक शहराचे संचालक ऍड. लक्ष्मण लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर हौराव पाटील विद्यापीठ, सातारा येथील कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, ओडिशा येथील NIST विद्यापीठाचे डीन डॉ. विश्वास चव्हाण आणि नाशिक येथील जैवविविधता तज्ञ डॉ. विजय बर्वे उपस्थित होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. बोरस्ते हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविकात कार्यक्रमाची उद्दिष्टे प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. विक्रम काकुळते यांनी स्पष्ट केली. कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी आपल्या भाषणात शाश्वत विकास साध्य करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि आंतरशाखीय संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले.

परिसंवादात विविध तांत्रिक आणि विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ. राधाकृष्ण पंडित आणि ओडिशा येथील डॉ. विश्वास चव्हाण यांची व्याख्याने झाली. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. जी. बी. खेडकर यांनी डीएनए बारकोडिंग या विषयावर माहिती दिली. डॉ. विजय बर्वे यांनी सांगितले की, सिटिझन सायन्स (Citizen Science) म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी वैज्ञानिक संशोधनात दिलेले योगदान होय. यामध्ये लोक स्वतः निरीक्षणे नोंदवतात, माहिती गोळा करतात आणि संशोधकांना मदत करतात. पर्यावरण संरक्षण, जैवविविधता अभ्यास यांसारख्या क्षेत्रांमध्ये याचे महत्त्व खूप आहे. त्यामुळे विज्ञान अधिक लोकाभिमुख बनते आणि समाजाचा सहभाग वाढतो.

या परिसंवादाला देशातील विविध संस्थांमधील संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी जैवविविधता, पर्यावरण अभ्यास आणि नाविन्यपूर्ण संशोधन पद्धती यासंबंधी संशोधन पत्रे आणि पोस्टर्स सादर केली. या परिसंवादामुळे शैक्षणिक संवाद, संशोधन विषयक चर्चा आणि ज्ञानाची देवाणघेवाण यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले. सादरीकरणाचे परीक्षण आणि मूल्यमापन प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ. ज्ञानेश्वर देशमुख, प्रवरानगर येथील पीव्हीपी महाविद्यालयाचे डॉ. अनिल कुऱ्हे, बिटको कॉलेजमधील डॉ. सुप्रिया सिंग गुप्ता आणि डॉ. विजय बर्वे यांनी केले. बक्षिसपात्र सादरीकरणात प्राजक्ता ढगे, हर्षदा भडांगे, डॉ. पूनम पवार, मंजिरी देसाई आणि प्रियांका सांगळे यांचा सहभाग होता.

परिसंवादाचा समारोप मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. शशिकांत मोगल, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना अहिरे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. शरद बिन्नोर, परिसंवादाचे संयोजक आणि प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. विक्रम काकुळते तसेच समन्वयक डॉ. मयुरा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुजाता मगदूम यांनी केले, तर आभार डॉ. सविता तिदमे आणि प्रा. प्रमोद सोनवणे यांनी मानले. परिसंवाद यशस्वी करण्यासाठी प्राचार्या डॉ. कल्पना अहिरे, प्राणिशास्त्र विभागातील डॉ. विक्रम काकुळते, डॉ. सुजाता मगदूम, डॉ. मयुरा पाटील, डॉ. गीतांजली निकम, डॉ. सविता तिदमे, डॉ. संगीता भामरे, डॉ. रामनाथ आंधळे, डॉ. कल्पना काळदाते, डॉ. ज्योती गांगुर्डे, प्रा. प्रतीक शिंदे, प्रा. हर्षदा भडांगे, प्रा. प्रमोद सोनावणे, प्रा. सपना भामरे, प्रा. स्वेता भामरे, प्रा. साक्षी डावरे, ऋतुजा मोरे, विजय मोरे, अशोक सांगळे आणि विद्यार्थी स्वयंसेवक यांनी विशेष प्रयत्न केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.