पोलिस स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी त्याच्याबरोबर फोटोसेशन करतात, गुन्हेगारी कमी होत नाही, उलट वाढते.”

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सांगली | दलित महासंघाचे अध्यक्ष कै. उत्तम दादा मोहिते यांच्या शोकसभेत विविध मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या. या वेळी बोलताना संघटनेचे प्रवक्ते संतोष पाटील यांनी सांगलीतील वाढत्या गुन्हेगारीवर जोरदार टीका केली.पाटील म्हणाले, “मुंबईनंतर सांगलीमध्ये गुन्हेगारी वाढण्यामागे पोलिसांची बेजबाबदार भूमिका हे एक प्रमुख कारण आहे. एखादा गुन्हेगार पकडला की पोलिस स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी त्याच्याबरोबर फोटोसेशन करतात. यामुळे गुन्हेगारी कमी होत नाही, उलट वाढते.”

ते पुढे म्हणाले, “ज्या गुन्हेगाराने कै. उत्तम दादा मोहिते यांची हत्या केली, त्या गुन्हेगाराची त्याच्या भागातून गाढवावर बसवून धिंड काढावी. अशा कठोर कारवाईमुळेच त्या परिसरातून गुन्हेगारीची दहशत नाहीशी होते. पोलिसांनी दया-माया न दाखवता अशा गुन्हेगारांना उघडपणे समाजासमोर आणणे गरजेचे आहे.”

या कार्यक्रमाला दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, डीपीआय अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे, मा. सुरेश दुधगावकर, माजी नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे, बहुजन क्रांती दलाचे राम कांबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, युवा हिंदुस्तान शिवप्रतिष्ठान अध्यक्ष नितीन चौगुले, पारधी हक्क समितीचे अध्यक्ष सुधाकर वायदंडे, किरण कांबळे, प्रशांत सदामते आदी मान्यवरांनी उपस्थिती दाखवली व आपली भावना व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गॅब्रिएल तेवढे यांनी केले. सतीश मोहिते यांनी आभार मानले. शोकसभेला शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली.

यु. ट्युबला क्लिक करून व्हीडीओ देखिल पहा…

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.