मेळाव्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी
कोल्हापूर – शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उप-मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गटप्रमुख मेळाव्याचे आयोजन बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता रामकृष्ण मंगल कार्यालय, मार्केट यार्ड कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे आयोजन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली असून, कार्यक्रमाला राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार जयश्री जाधव, तसेच कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख सत्यजित कदम, शिवसेना कोल्हापूर दक्षिण प्रमुख शारंगधर देशमुख, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने आदी मान्यवर नेते यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटप्रमुख, पदाधिकारी व शिवसैनिक या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार, विकासात्मक उपक्रम आणि आगामी निवडणुकांच्या तयारीवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मेळाव्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.













































