सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून पिंपळगाव येथे ५ दिवसीय ‘सर्व रोग निदान महाआरोग्य शिबीर’

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महाआरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पिंपळगाव प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ०३ नोव्हेंबर २०२५ ते ०७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भव्य ‘सर्व रोग निदान महाआरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना सर्व प्रकारची तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत मिळणार आहेत.

शिबिराचे स्थळ – प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर⏰ : सोमवार दि. ०३ नोव्हेंबर २०२५ ते शुक्रवार ०७ नोव्हेंबर २०२५, सकाळी ९.०० ते सायं. ५.०० पर्यंत या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ० ते १५ वर्ष वयोगटातील बालकांची तपासणी व मोफत पुढील उपचार, तसेच १५ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती व सर्व ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी व उपचार केले जातील.

शबिरातील प्रमुख मोफत सुविधा –

तपासण्या – एचएलएल (HLL) द्वारे सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या, आवश्यकतेनुसार ईसीजी (ECG), एक्सरे (X-Ray), सोनोग्राफी (Sonography) व २ डी ईको (2D Eco) तपासणी. (५ ते १० हजार रुपये खर्च येणाऱ्या सर्व तपासण्या मोफत)

आजारांचे निदान – हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, श्वसन विकार, अस्थिरोग, दंत तपासणी, मानसिक आरोग्य, तंबाखूजन्य आजार तपासणी व समुपदेशन.

लाभ वितरण – आयुष्मान आरोग्य गोल्डन कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, वयोवंदना कार्ड, श्रवण यंत्र व चष्मे वाटप.

पुढील मार्गदर्शन – औषध वितरण, आरोग्य सल्ला, समुपदेशन, व गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी विशेष रेफरल (संदर्भ) सुविधा.

विशेष तपासणी व आरोग्य सुविधा – दिनांक दिवस तपासणीचे विषय –

०३/११/२०२५ सोमवार सर्व रोग निदान तपासणी, शाळा व अंगणवाडीतील ० ते १५ वयोगटातील मुला/मुलींची आरोग्य तपासणी, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, दृष्टी, श्रवण तपासणी (श्रवण यंत्र व चष्मे वाटप).
०४/११/२०२५ मंगळवार महिला आरोग्य तपासणी
०५/११/२०२५ बुधवार गर्भवती व स्तनदा माता तपासणी व समुपदेशन
०६/११/२०२५ गुरुवार पुरुष आरोग्य तपासणी (मधुमेह, रक्तदाब, स्थूलता, तंबाखूजन्य आजार इत्यादी)
०७/११/२०२५ शुक्रवार पुरुष आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर व सर्वसामान्य आरोग्य मार्गदर्शन

या महाआरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.