कागल एमआयडीसीत नवे उपकेंद्र कार्यान्वित : उद्योगांना गती व गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर :
महावितरणकडून कागल एमआयडीसीतील डी-ब्लॉक येथे नविन 33/11 केव्ही उपकेंद्र सोमवार (दि.१५) रोजी मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. या उपकेंद्रामुळे कागल एमआयडीसीतील औद्योगिक ग्राहकांना अधिक दर्जेदार व जलद सेवा मिळणार आहे. वाढीव भारासोबतच नवीन उद्योगांना वीज जोडणी त्वरित देता येणार आहे.

या उपकेंद्राच्या कार्यान्वय प्रसंगी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कागल-हातकणंगलेचे अध्यक्ष मोहन कुशिरे, माजी अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, खजानीस अमृतराव यादव, कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंता पूनम रोकडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, अभियंता जी.व्ही. पाथरवट व कागल उपविभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

‘आरडीएसएस’ या महत्वाकांक्षी योजनेतून हे काम पूर्ण करण्यात आले असून येथे १० एमव्हीए क्षमतेची दोन रोहित्रे बसवली आहेत. या उपकेंद्रातून चार वीजवाहिन्या बाहेर पडणार आहेत. यामुळे सध्या प्रलंबित असणाऱ्या लघुदाब व उच्चदाब उद्योगांना वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हुपरी, मायनर आणि सांगाव उपकेंद्रावरील भारही कमी झाला आहे.

उपकेंद्र उभारणीसाठी एसओपीमध्ये १२ महिने कालावधी असतानाही भारत इलेक्ट्रिकल या कंत्राटदार संस्थेने अवघ्या तीन महिन्यांत हे काम निकषांनुसार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण केले. यापूर्वी कमी दाबाचा पुरवठा, जोडणीतील अडचणी आणि उत्पादनातील अडथळे या समस्या उद्योगांना भेडसावत होत्या. या उपकेंद्रामुळे आता औद्योगिक क्षेत्राला गती मिळणार असल्याने उद्योग संघटना व ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ही बातमी देखिल जास्त वाचली गेली... वीज मागणीच्या अंदाजासाठी एआयचा वापर, महावितरणचा फिक्कीतर्फे सन्मान

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.