“गणपत वाणी बिडी पिताना”वर नाविन्यपूर्ण प्रयोग..राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

‘चिपळूण मसाप आणि चिपळूण कोमसाप’चा पुढाकार 

‘गणपत वाणी बिडी पिताना’वर ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव 

स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

चिपळूण :: येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव स्वरुपाची ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थ ‘राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनालेखनासाठी बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘गणपत वाणी’ या कवितेतील पहिलीच ओळ “गणपत वाणी बिडी पिताना” देण्यात आली आहे. आजवरच्या साहित्य इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच क्रियाशील प्रयोग असल्याने राज्यभरातील कवींमध्ये यास्पर्धेबाबत उत्सुकता आहे.

गणपत वाणी बिडी पिताना

स्वत:तून वजा झाल्यासारखा

शून्यात पाहात राहीला

उर्ध्वगामी जात नष्ट होणाऱ्या

धुम्रवलयांकडे.

भयकंपीत चेहऱ्याने पाहात राहीला

त्याच्या पोराने फ्लिपकार्ट वरुन

मागवलेल्या डझनभर वस्तूंकडे.

गणपत वाणी बिडी पिताना

आडोशाला व्यथा आंधळी

सावरीत जी उभी कधीची

गलितगात्र खांद्यावर झोळी

गहन धुराचा ढीग साचला

भवतालावर-फडतालावर

उगाच वटवाघूळ फडफडते

धुरकटल्या काळ्या आढ्यावर.

 

गणपत वाणी बिडी पिताना

शोधायाचा जात आपुली

विरत जाणाऱ्या धुरामधूनी

आणि शिल्लक थोटूक निरखत

उमजून घ्यायचा पत आपुली.

एखाद्या सर्वज्ञात कविच्या गाजलेल्या कवितेची ओळ घेऊन त्याच्या मूळ कवितेपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीच्या अभिव्यक्तीची कविता निर्माण करून त्यातून सद्यस्थितीची विविधांगी मांडणी करणे आणि त्यातून चर्चित, अचर्चित समाज वास्तवाला भिडणे असे या संकल्पनेचे स्पर्धा स्वरूप आहे. “गणपत वाणी बिडी पिताना”ही ओळ स्पर्धेसाठी सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक कवितेत किमान एकदा तरी येणे अपेक्षित आहे.

काव्यलेखकस्पर्धकाने कवितेच्या सुरुवातीला ही ओळ वापरणे अधिक कसदार मानण्यात येईल. या ओळीशिवाय या कवितेमधील इतर दुसऱ्या कोणत्याही ओळीवर किंवा मर्ढेकरांच्या इतर कवितेवर किंवा इतर कवीच्या कोणत्याची कवितेवर केलेले संस्करण स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. नवीन तयार होणाऱ्या कवितेतील अभिव्यक्ती मूळ कवितेपासून जितकी दूर जाईल तितकी ती यशाच्या अधिक जवळ जाईल, असा या संकल्पनेमागील विचार आहे.

मूळ कवितेच्या ढाच्याला, आशयाला, शब्दांना आणि विषयाला या नव्या रचनेने अधिक कलासक्त वैचारिक बैठकीने कलाटणी द्यावी. वर्तमानाचे संदर्भ, नाविन्य, डौल, आशयाची घनता या गोष्टींचेही भान राखावे असा एकंदरीत विचार या स्पर्धेच्या आयोजनामागे आहे. या स्पर्धेसाठी मूळ कवितेचे विडंबन तसेच कोणत्याही अन्य प्रकारची कविता वरील मुद्द्यांच्या आधारे स्पर्धेस पात्र राहिल.

पारितोषिके

  • प्रथम : रु. ५,०००/- + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह + प्रवास खर्च

  • द्वितीय : रु. ३,०००/- + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह + प्रवास खर्च

  • तृतीय : रु. २,०००/- + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह + प्रवास खर्च

  • पाच उत्तेजनार्थ पारितोषिके : प्रत्येकी रु. १,०००/-

सहभाग कसा घ्यावा?

  • कविता मराठी भाषेत मोबाईलवर टाईप करून पाठवावी.

  • नाव, पत्ता, मोबाईल नंबर, संपूर्ण परिचय अनिवार्य.

  • एका मोबाईल नंबरवरून फक्त एकच कविता ग्राह्य.

  • लांबी-रुंदीवर बंधन नाही, पण कविता “कवितेएवढी” असावी.

  • निवडक उत्तम कवितांचा संग्रह प्रकाशित करण्याचा आयोजकांचा मानस आहे.

  • प्रवेश शुल्क नाही.

  • शेवटची तारीख : २६ ऑक्टोबर २०२५.

गणपत वाणी बिडी पिताना”
ही स्पर्धेतील प्रत्येक कवितेत किमान एकदा तरी यावी, अशी अट आहे. कवितेच्या सुरुवातीला ही ओळ वापरणाऱ्यांना अधिक गुण दिले जातील.आयोजकांनी स्पष्ट केले आहे की, मूळ कवितेपासून जितकी नवी कविता दूर जाईल तितकी ती यशाच्या जवळ जाईल. नाविन्यपूर्ण, वर्तमानाला भिडणारी, सामाजिक वास्तव मांडणारी अभिव्यक्ती या स्पर्धेचा हेतू आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.